Grain Market Update : गरीब घरची भाकर झाली महाग; गहू, बाजरीच्या दरात मोठी वाढ

Grain News
Grain Newsesakal
Updated on

बिजोरसे : महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यातली बाजरी महाग झाल्याने कसे जीवन जगावे असा प्रश्न आज सर्वसामान्य शेतकरी व मजूरांना भेडसावत आहे. गरिबांची भाकर खूप महाग झाल्याने येणाऱ्या काळात घर कसे चालवावे अशी चिंता आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील खास पसंत असलेली बाजरी धान्य बाजारात महाग ठरली आहे. शेतकरी नवनवीन पीक घेऊन शेतीत प्रयोग करीत आहे. त्यामुळे बाजरी पीक घ्यायला कुणी तयार नाही. उत्पादन घटले आहे.

त्यामुळे गरीब घरची चटणी भाकर आता महाग झालेली आहे. सध्या बाजरीला २६०० ते २७०० रुपयापर्यंत क्विंटलचा भाव आहे. वर्षानुवर्षे बाजरीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असायचा. बाजरी गव्हाच्या बरोबरीला आले असून ग्रामीण भागात बाजरीच्या भाकरी शिवाय घराघरांत खवय्यांना आवडीचा विषय असणारी बाजरी मिळेनासे झाली आहे. (Food Grain Market Update Big hike in wheat millet prices Nashik News)

Grain News
Jalgaon Crime News : गाडीला लागलेला ठोसा पाहणे पडले महागात; रोकड, दागिन्यांसह साडेचार लाख लंपास

हॉटेलमध्ये खास भाकरीला आता ऑफर आहे. त्याप्रमाणे गहू सुद्धा गेल्या आठवड्यात ३ हजार क्विंटल होता. आता ३ हजार ३०० ते ३ हजार ४०० रुपये झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात अत्यल्प उत्पादन झाले आहे.

शेतकरी वर्गातील मजूर तसेच सर्वच जण बाजरीचा सर्वाधिक वापर करतात. पूर्वी ज्याच्या घरी धान्याची रास राहायची तो श्रीमंत गणला जायचा. पण आज श्रीमंताकडे ही धान्याच्या राशी पाहायला मिळत नाही. इतर पिकांवर जास्त भर असल्यामुळे बाजरीचे उत्पादन घटले असून त्यामुळे साहजिकच बाजरीचे भाव गगनाला भिडलेले आहेत.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Grain News
Jalgaon News : हरिनाम किर्तन, पारायण सप्ताहाची पाचोरा येथे सांगता

पण येणाऱ्या काळात बाजरीचे पीक घेणे आवश्यकच शेतकऱ्यांना वाटेल बाजरी साठी लागणारा खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ पूर्वीपासून बसत नाही व आजही बसत नाही. पावसाळ्यात बाजरीची पेरणी प्रत्येक शेतकरी करायचा पण आज कुणीही बाजरी टाकत नाही. बाजरी पिकासाठी तांत्रिक साधने नसल्याकारणाने आर्थिक दृष्ट्या परवडत नाही.

उतारा पण येत नाही. बाजरी पैरणी पासून ते काढेपर्यंत खूपच खर्च येतो मजूरही मिळत नाही. अशा कारणाने परवडत नाही. पण आरोग्याच्या दृष्टीने गव्हापेक्षा बाजरी ही फार चांगली आहे असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत असून त्याचप्रमाणे पावसाळी व उन्हाळी बाजरीचे उत्तर महाराष्ट्रात उत्पादन घटल्याने सध्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश राजस्थान व गुजरात या भागातून विक्रीसाठी येत आहे. मुंबई, पुणे व नागपूर शहरी भागात सुद्धा बाजरीला खूप मागणी आहे. यामुळे गरीब घरची भाकर करपली आहे.

Grain News
NMU Jalgaon News | सोशल मीडियापेक्षा वाचनावर भर द्यावा : सीए रवींद्र पाटील

एकरी सरसरी खर्च

बियाणे ४००

पेरणी २५००

नागरणी २५००

रोटर २५००

निंदणी ३५००

खते ४०००

कापणी ३५००

काढणी १४००

व इतर १०००

एकरी उत्पादन - १० ते ११ क्विंटल

"बाजरी ही पूर्वी सर्व शेतकरी करायचे पण त्यावेळी मजूर मिळायचे. आता मजूर मिळत नाही. तसेच एकरी उतारा पण कमी आहे. नवीन वाण जर आले तर शेतकरी बाजरी पैरतील."

- के. बी. मोरे (सेवानिवृत्त कृषी अधिकारी नामपूर)

"पूर्वी पासून सर्वच बाजरी खायचे व आजही खातात. पण उत्पादन कमी व खर्च जास्त त्यामुळे शेतकरी बाजरी पिकाऐवजी दुसरे पीक घेऊ लागले. यावर शासनाने विचार करून बाजरीची किमती कराव्यात जेणेकरून सर्वाना परवडेल."

- रावसाहेब काकडे (शेतकरी बिजोरसे

Grain News
Nashik NMC News : मालमत्ताधारकांना नगररचना विभागाचा दणका; शोध मोहिमेत आढळलेल्या मालमत्तांना नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.