Nashik News: रेशनकार्डसाठी दिव्यांग थेट तहसीलदार दालनात

Disabled persons camped at Tehsil office to demand ration card
Disabled persons camped at Tehsil office to demand ration card esakal
Updated on

Nashik News : अंत्योदय योजनेसाठी सहा महिन्यापूर्वी अर्ज करूनही तहसिल कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दिव्यांग बांधवांनी सोमवारी (ता. २६) तहसिल कार्यालयात तळ ठोकून निषेध केला.

तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय रेशनकार्डसाठी अर्ज करून सहा महिने होऊनही लाभ मिळत नसल्याने दिव्यांगांनी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र टिळे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक तहसीलदार कार्यालय गाठले. (For Ration Card Disable people gathered directly in Tehsildar Hall Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Disabled persons camped at Tehsil office to demand ration card
Nashik BJP News: काकांवर पुतण्याची पत्रकाद्वारे टीका! भाजपमधील वाद चव्हाट्यावर

रिमझिम पावसात ही दिव्यांगांनी सहभाग नोंदवून तहसीलदार यांना जाब विचारला. काही दिव्यांगांना पिवळी शिधापत्रिका मिळूनही त्यांना अद्याप धान्य मिळत नसल्याचे, तसेच संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करूनही मंजुरी देण्यात आली नाही असे तालुकाध्यक्ष रवींद्र टिळे यांनी सांगितले.

गरजू दिव्यांगांना शिधापत्रिका व संजय गांधी निराधार योजना बैठक घेउन तोडगा काढला जाईल, असे तहसिलदारांनी सांगितले.

उपतालुकाध्यक्ष शरद नरवाडे, तालुका सचिव यशवंत सातपुते, गोकूळ कांडेकर, बापू झाडे, कैलास ढिकले, लक्ष्मण कांगणे, विलास कदम, शशिकांत पगार, तानुबाई खांडवाले- नरवडे, मनीषा सूर्यवंशी, ख़ुशी कदम आदी उपस्थित होते.

Disabled persons camped at Tehsil office to demand ration card
Nashik News: प्रकल्पग्रस्तांचा पायी मोर्चा मुंबईकडे रवाना; मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.