Nashik News : आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त ‘रामसर साइट’ नांदूरमध्यमेश्वरला येण्यास स्थलांतरित पक्षी नाराज झाल्याचे चित्र दिसून आले आहे. यास पक्षीतज्ज्ञ तथा अभ्यासकांनी दुजोरा दिला. हे परदेशी पाहुणे पुढील महिन्यात येतील, असे पक्षीतज्ज्ञांनी सांगितले.
जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असून, येथे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पक्षी स्थलांतर करून येतात. (Foreign birds will arrive next month in Nandur Madhyameshwar nashik news)
भारतीय उपखंडात दोन मार्गांनी पक्षी स्थलांतर करून येतात. त्यातील सर्वांत महत्त्वाचा मार्ग हा इंडस व्हॅली मार्ग म्हणून ओळखला जातो. हा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेला, पाणथळीच्या पक्ष्यांचा चौथ्या क्रमांकाचा मार्ग म्हणून ओळखला जातो.
भारतात येणारे बहुतेक पक्षी या मार्गाने येतात. पक्ष्यांचा दुसरा हवाई मार्ग हा ईशान्येकडून ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो. यात आशियायी मार्गात भारताचा ९५ टक्के भूभाग व्यापला जातो. स्थलांतरित पक्षी हे युरोप, रशिया व आफ्रिकेतून येतात. भारतात प्रामुख्याने उत्तर- दक्षिण असे स्थलांतर करतात.
हा प्रवास साधारण चार ते सहा हजार किलोमीटरचा असतो. परतीच्या प्रवासात एवढेच अंतर कापावे लागते.
नांदूरमध्यमेश्वरला स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांमध्ये बार हेडेड गीज, ऑस्प्रे, मार्श हॅरिअर, शॉव्हलर बदक, युरेशिअन विजन, टप्टेड डक, मोठा पाणकावळा, जांभळा बगळा, राखाडी बगळा, वारकरी पाणकावळे, बगळे, कुदळ्या आदी पक्षी आले आहेत; परंतु त्यांची संख्या कमी आहे.
"स्थलांतरित पक्षी येण्यास भारतात सुरवात झाली आहे. हळूहळू नंबर वाढेल. यंदा पक्षी स्थलांतरास उशिरा सुरवात झालेली असून, आता गुजरातमार्गे पक्षी प्रवेश करीत असून, डिसेंबरमध्ये संख्या वाढेल." - डॉ. पी. साथीसेवलम, पक्षीतज्ज्ञ (बीएनएचएस)
"नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी अधिवास आहे. मात्र, पक्षीसंख्या कमी आहे. प्रमुख कारण पाणवेली असून, त्यावर उपाययोजना वन विभागाने करावी." - अनंत सरोदे, पक्षी अभ्यासक
"यंदा पक्षी उशिरा येत आहेत. जे प्रमुख प्रजातीतील पक्षी आले आहेत, त्यातही अगदी तुरळक संख्येने आहेत." - डॉ. अनिल माळी, पक्षी अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.