लासलगाव (जि. नाशिक) : उत्कृष्ट स्वादामुळे जगाच्या पाठीवर ओळख निर्माण करणाऱ्या कांदा निर्यातीतून (Onion Export) देशाला एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ यादरम्यान १३ लाख २३ हजार ७१० टन कांदा निर्यात होऊन दोन हजार ९७३ कोटी रुपयांचे परकीय चलन (Foreign currency) देशाला मिळाले. पुरवठ्यातील सातत्य, विश्वासार्हता आणि कमी कालावधीत दर्जेदार कांदा पोचविण्याची भारतीय निर्यातदारांची क्षमता यामुळे कांदा निर्यात सुरू आहे. (Foreign exchange worth crores of rupees in 11 months from onion exports Nashik Onion News)
सध्या बाजार समितीत उन्हाळ कांदा विक्रीस येत असून, नऊशे रुपये प्रतिक्विंटल असा भाव आहे. मात्र बदलत्या वातावरणाने कांदा उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना या भावाचा फायदा होत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. दुसरीकडे देशात २६ राज्यांत कांदा पिकू लागल्याने उत्पादनात वाढ होत आहे. मात्र निर्यात जैसे थे असल्याने कांद्याला समाधानकारक भाव मिळत नाही. यासाठी दीर्घ कालीन धोरण आवश्यक आहे. त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना, कंटेनर भाड्यात घट, ट्रान्झिन्ट अनुदान या उपाययोजना केल्यास निर्यातीतून परकीय चलन मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
भारतात दरवर्षी सुमारे २०० दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन होते. एकूण उत्पादनाच्या ९० टक्क्यापर्यंत देशांतर्गत वापरासाठी वापरले जाते, तर उर्वरित साठा योग्य वेळी निर्यात केला जातो. दरवर्षी अनेक देशांना कांदा निर्यात होते. कांदा उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि त्यानंतर अनुक्रमे हरियाणा, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये कांद्याची लागवड होते. सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य असलेल्या महाराष्ट्रात या वेळी कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
निर्यात आकडे परकीय चलन
* २००९-१० - १८.७३ लाख टन -२८३४ कोटी
* २००१०-११ - १३.४० लाख टन - २१५९ कोटी
* २०११-१२ - १५.५२ लाख टन -२१४१ कोटी
* २०१२-१३ - १८.२२ लाख टन -२२९४ कोटी
* २०१३-१४ - १३.५० लाख टन -२८७७ कोटी
* २०१४-१५ - १०.८६ लाख टन -२०१० कोटी
* २०१५-१६ - ११.१४ लाख टन - २५२८ कोटी
* २०१६-१७ ३४.९२ लाख टन - ४६५१ कोटी
* २०१७-१८ ३०.८८ लाख टन - ३०८८ कोटी
* २०१८-१९ २१ .८३ लाख टन - ३४६८ कोटी
*२०१९-२० - ११.४९ लाख टन २३२० कोटी
*२०२०-२१ - १५.७७ लाख टन २८२६ कोटी
*२०२१-२२ (एप्रिल ते फेब्रुवारी ) १३.२३ लाख टन २९७३ कोटी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.