नाशिक : वन्यजीवांच्या अवयवांची विक्री (Sale of wildlife organs) केल्याप्रकरणी रविवार पेठ येथील दगडू तेली (चांदवडकर) यांच्या तीन नंबरच्या सुकामेवा व काष्ट औषधी वनस्पती (Herbs) या दुकानावर छापा (Raid) टाकून वन्यजीवांचे अवयव जप्त (Seized) केले. या सर्व अवयव हे कुठल्या वन्यजीवांचे आहे. याची ओळख वनविभागाकडून केली जात आहे. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९, ३९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Forest Department raids Dagdu Teli shop Seized wildlife organs Nashik Crime News)
रविवार पेठ येथील तेली गल्ली येथे सुखलाल दगडू तेली चांदवडकर यांच्या मालकीच्या सुकामेवा व काष्ट औषधी वनस्पती या तीन नंबरच्या दुकानात संरक्षित वन्यजीवांच्या अवयवाची सर्रास विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या अधिकार्यांनी लागली. या माहितीच्या आधारे सोमवारी (ता.४) वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सायंकाळच्या सुमारास या दुकानावर छापा मारला असता पथकास याठिकाणाहून विविध वन्यजीव यांचे अवयव मिळून आले. पथकाने सदरचे सर्व अवयव जप्त केले. जप्त सर्व अवयवांची ओळख पटविण्याचे काम विभागाकडून केले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.