चांदोरी (जि. नाशिक) : भौगोलिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या नाशिकच्या आजूबाजूला वन्यजीवांची जैवविविधता चांगली आहे. मात्र, या जैवविविधतेवर अपघाताचा ही धोका निर्माण होत आहे. यामुळे नाशिककर वन्यजीवप्रेमींसह वन विभागाची जबाबदारी वाढली आहे. वनपाल भगवान जाधव यांनी एका घोरपडीला जीवनदान दिले आहे.
रस्ता अपघातात वाचवत महाराष्ट्रीयन प्रजातीच्या घोरपडीला त्यांनी पुन्हा तीला निफाड वन उद्यान येथे सुरक्षीत सोडले आहे. प्रामुख्यानं जंगलात आढळणारी ही घोरपड पिंपळस रामाचे येथे सकाळी ११ च्या दरम्यान आढळली. काही वेळातच ही बातमी आजूबाजूच्या परीसरात वाऱ्यासारखी पसरली. या घोरपडीला पाहण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. (Forester Bhagwan Jadhav saved ghorpad at chandori nashik news)
चांदोरी परिसरात बिबट्या संदर्भात असलेल्या तक्रारीची दखल घेत पाहणी करण्यासाठी वनपाल भगवान जाधव हे आलेले होते. पुन्हा निफाड जात अस्तनांना पिंपळस रामाचे दरम्यान गर्दी बघत थांबले असता घोरपड असल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने उचलत निफाड येथे कार्यालयात घेऊन गेले. त्यांच्या या सजगतेमुळे त्या घोरपडीला जीवनदान मिळाले आहे. जवळपास दोन ते अडीच फुट लांबीची ही घोरपड असून तिला वैद्यकीय तपासणी करत निफाड वनोद्यानात सोडण्यात आल्याचे समजते.
"वन्यजीव नैसर्गिक अधिवास व्यतिरिक्त ही आढळून येत आहे.नागरिकांनी ही अशी काही घटना आढळल्यास वनविभागासमावेत संपर्क करावा." - अक्षय म्हेत्रे, वनक्षेत्रपाल, येवला
"वन्यजीवांची काळजी घेणं ही नागरिकांची जबाबदारी पार पाडतांना वन्यजीवांना इजा पोहोचणार नाही याची सुद्धा दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे."
- दीपक बिडकर, ग्रामस्थ, पिंपळस रामाचे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.