Nashik: GDP आराखड्यात दुष्काळी तालुक्यांचा विसर! द्राक्ष निर्यात, वाइन उद्योग, टेक्स्टाईल पार्कसह कांदा साठवणुकीवरच भिस्त

आराखडा तयार करताना पर्जन्यछायेच्या सिन्नर, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव या तालुक्यांचा विचार केलेला नाही.
GDP News
GDP Newsesakal
Updated on

किरण कवाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्याच्या ‘जीडीपी’मध्ये १५६ टक्के वाढ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पंचवार्षिक आराखड्यात कृषी, उत्पादन व सेवा क्षेत्रामध्ये पुढील पाच वर्षांत किती गुंतवणूक होऊ शकते, याचे आकडे स्पष्टपणे मांडले आहेत.

मात्र, आराखडा तयार करताना पर्जन्यछायेच्या सिन्नर, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव या तालुक्यांचा विचार केलेला नाही. (Forget drought talukas in GDP plan Focused on grape export wine industry textile park along with onion storage Nashik)

पंचवार्षिक आराखड्याचे आकडे बघितले, तर कृषी क्षेत्रात ३० हजार कोटी, उत्पादन क्षेत्रात २० हजार कोटी, पायाभूत सुविधांमध्ये दहा हजार कोटी, मनोरंजन क्षेत्रात दहा हजार कोटी व मेडिकल टुरिझममध्ये ६० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित धरली आहे.

मात्र, ही गुंतवणूक कशी येणार, कोण करणार, याबाबत आराखड्यात काहीही भाष्य केलेले आढळत नाही.

मुळात या क्षेत्रातील गुंतवणूक विचारात घेताना नाशिक, दिंडोरी, निफाड, कळवण या तालुक्यांचा अपवाद सोडला, तर बहुतांश तालुक्यांमध्ये सिंचनाच्या पुरेशा सुविधा नसल्याने तेथील शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

आदिवासी तालुक्यांत प्रचंड पाऊस पडत असला, तरी तेथे पावसाळ्याव्यतिरिक्त पिके घेता येत नाहीत. तसेच दुष्काळग्रस्त सिन्नर, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव या तालुक्यांमध्ये सिंचनाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत.

या दोन्ही भागांत सिंचनाच्या सुविधा वाढल्यास कृषी उत्पादनात वाढ होऊन कृषी उत्पादन, कृषी प्रक्रिया व निर्यात या तिन्ही पातळ्यांवर वाढ होऊन जिल्ह्याचा ‘जीडीपी’ वाढेल. पण, यासाठी सिंचनात वाढ हा मुद्दा महत्त्वाचा असूनही त्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवण्याबाबत या आराखड्यात साधा उल्लेखही केलेला नाही.

या आराखड्यात प्रस्तावित उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी, कृषी प्रक्रिया, कृषी पायाभूत सुविधा व कृषी निर्यात यासाठी जवळपास १७ हजार ५०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे.

यात द्राक्ष निर्यात वाढवणे, वाइन उद्योगाला चालना देणे, द्राक्षप्रक्रिया म्हणजे बेदाणा उद्योगाला चालना देणे, दुबई येथील आयातदारांच्या दृष्टीने कृषी उत्पादन, निर्यात सुविधा केंद्र उभारणे आदी बाबी प्रस्तावित केल्या आहेत.

तसेच टेक्स्टाईल पार्क उभारणे, कांदा साठवणुकीसाठी प्रोत्साहन देणे आदी बाबीही प्रस्तावित आहेत.

धार्मिक पर्यटनाला चालना

जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करून धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी शिर्डी-वणी-त्र्यंबकेश्वर हे ‘भक्ती, मुक्ती व शक्ती’ कॉरिडॉर तसेच रिंग रोड प्रस्तावित असून, त्यासाठी दहा हजार कोटी व पर्यटनाला चालना देण्यासाठी दीड हजार कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे.

याशिवाय समृद्धी महामार्गाला घोटी येथून जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

GDP News
Nashik News : आमदार फरांदे यांच्यामुळे तक्रार असलेल्या कॅफेला ‘टाळे’!

आयटी क्षेत्रात ३० हजार कोटींची गुंतवणूक

उत्पादन क्षेत्रात प्रामुख्याने वाहन उद्योग, प्लास्टिक क्लस्टर, दिल्ली-मुंबई कॉरिडॉर, फार्मा क्लस्टर, डिफेन्स हब, इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब आदी बाबींसाठी साधारण २५ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

याशिवाय आयटी पार्क उभारून आयटी क्षेत्रातील उद्योग नाशिकमध्ये आल्यास ‘जीडीपी’मध्ये वाढ होऊ शकते, असे गृहित धरून या क्षेत्रात पुढील पाच वर्षांत किमान ३० हजार कोटींची गुंतवणूक होऊ शकते, असे जिल्हा प्रशासनाला अपेक्षित आहे.

प्रकल्पनिहाय गुंतवणूक क्षेत्र अपेक्षित गुंतवणूक

पिके व फळबागा १,१५० कोटी

निर्यात व प्रक्रिया १६,५०० कोटी

डिफेन्स हब २००० कोटी

फार्मा क्लस्टर २५० कोटी

दिल्ली-मुंबई कॉरिडॉर १० हजार कोटी

प्लास्टिक क्लस्टर २५० कोटी

आयटी पार्क ३० हजार कोटी

शक्ती-मुक्ती-भक्ती रिंग रोड १० हजार कोटी

वाहन उद्योग १२ हजार कोटी

फिल्म स्टुडिओ १० हजार कोटी

मेडिकल टुरिझम ६३ हजार कोटी

GDP News
National Youth Festival : देशाच्या प्रगतीत युवकांचे स्थान महत्त्वाचे : निसिथ प्रामाणिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()