नाशिक : शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) नाशिक दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये भाजपला (BJP) पहिला धक्का दिला आहे. राऊत यांच्या अचानक ठरलेल्या नाशिक दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून सेना-भाजपातील राड्यानंतर राऊत नाशिककडे आले आहेत. राऊत यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून आहे.
भाजपचे माजी उपमहापौर सेनेच्या वाटेवर..
भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते हे सेनेच्या वाटेवर असल्याचे समजत असून गीते यांनी घेतली संजय राऊत यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. भाजपात गळचेपी होत असून बोलू दिल जात नसल्याचा आरोप माजी उपमहापौर गीते यांनी केला आहे. यामुळे संजय राऊत यांचा भाजपला नाशिकमध्ये पहिला धक्का बसणार आहे. गिते-राऊत भेटीने नाशिकमध्ये भाजपा पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान गितेंच्या पक्ष प्रवेशाची तारीख मात्र अद्याप निश्चित नाही.
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर; राणेंवर निशाणा
संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. नाशिकने उठवलेलं वादळ अजून शमलेलं नाही. आता कानफडात मारण्याची भिती वाटते. कायदेशीर, नाहीतर लगेच गुन्हा दाखल होतो आणि अटक होते. याला जबाबदार नारायण राणे आहेत. राणें यांनी अतिशहाणपणा केला, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला.
'त्या' शिवसैनिकांना अटकपूर्व जामीन मंजूर...
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर महाराष्ट्रभर सेना आणि भाजप (shivsena and bjp) कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी नाशिकमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कार्यकर्त्यांचा शोध नाशिक पोलीस घेत होते. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर या कार्यकर्त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं संजय राऊत काल (ता.२७) यावेळी सांगितलं होतं. भाजपा कार्यालयात हल्लाप्रकरणी शिवसेना नगरसेवक दीपक दातीर आणि बाळा दराडे यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.