Nashik News : पदाच्या लालसेतून प्रवेश करणाऱ्यांना भाजपत थारा नाही : सोनवणे

BJP
BJPesakal
Updated on

Nashik News : भारतीय जनता पक्षात शिस्त आणि निष्ठा यांना मोलाचे स्थान आहे. प्रामाणिक हेतूने इतर पक्षातून प्रवेश करू इच्छिणाऱ्यांचे भाजपत नेहमीच स्वागत केले जाते. (Former City President of BJP Sahebrao Sonawane statement about bjp nashik news)

मात्र मनात पदाची लालसा ठेवून पक्ष प्रवेश करणाऱ्यांना पक्षात कोणताही थारा दिला जात नाही, असे मत भाजपचे माजी शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे यांनी येथे केले. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. सोनवणे बोलत होते.

ते म्हणाले, सटाणा शहर आणि तालुक्यात पक्ष वाढीसाठी दिवंगत मंत्री डॉ. दौलतराव आहेर, माजी नगराध्यक्ष अर्जुन अहिरे, माजी नगरसेवक सुभाष ततार, दयाराम सोनवणे, नितीन देवरे यांच्यासह अनेकांनी जिवाचे रान केल्यामुळेच आज तालुक्यात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. गत पालिका निवडणुकीनंतर शहर विकास आघाडी व भाजपने एकत्रित काम करताना खासदार डॉ.भामरे यांनी शंभर कोटींहून अधिक निधी पालिकेला आणून दिला.

कार्यकाळ संपताच खासदार डॉ. भामरे यांनी भाजप व शहर विकास आघाडीच्या युतीचा प्रस्ताव सुनील मोरेंना देताच त्यांनी तो नाकारला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून छगन भुजबळ माझे नेते असल्याने मी भाजपत येऊ शकत नाही, असे कारण मोरेंनी पुढे केले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

BJP
Technical Education : राज्यात 516 शाळा होणार तंत्रशिक्षण समृद्ध! 10 हजार 594 स्मार्ट क्लासरूम

मात्र सत्ता बदलताच मोरे यांनी भाजप प्रवेशाची टूम सोडली आणि वरिष्ठांशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न केला. ही बाब प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. सुनील मोरेंना पक्षात प्रवेश करून घेत असताना तळागाळातील कार्यकर्ता, पदाधिकारी व ज्येष्ठांना विश्वासात घेऊनच करावा, अशी भूमिकाही सोनवणे यांनी मांडली.

यावेळी भाजप शहराध्यक्ष राहुल सोनवणे, तालुकाध्यक्ष संजय देवरे आदींनी मार्गदर्शन केले. बैठकीस श्रीधर कोठावदे, रमेश देवरे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंगेश खैरनार, दत्तू सोनवणे, काका सोनवणे, मुन्ना शेख, दीपक पाकळे, निर्मला भदाणे, ज्योती ठाकरे, पुष्पलता पाटील, अॅड. रूपाली पंडित, नूतन गांगुर्डे,

लीलावती कापडणीस, दीपक अहिरे, समको संचालक जगदीश मुंडावरे, प्रा. धनंजय पंडित, दिलीप खैरनार, दिलीप सोनवणे, शिवाजी सोनवणे, अनिल पाकळे, किरण नांद्रे, अनिल सोनवणे, देवेंद्र पवार, महेंद्र पवार, जे. डी. पवार, प्रकाश कुमावत, विश्वास सोनवणे, दीपक जापाणी, विलास सोनवणे, विनोद नंदाळे, सईद मुल्ला, हेमंत भदाणे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

BJP
Saptashrungi Gad : सप्तशृंगगडावर निवाराशेडसाठी 3 कोटींचा निधी मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.