Nashik Political News : माजी नगराध्यक्ष मोरे समर्थकांसह लवकरच भाजपमध्ये जाणार?

BJP
BJPesakal
Updated on

सटाणा (जि. नाशिक) : येथील शहर विकास आघाडीचे संस्थापक व माजी थेट नगराध्यक्ष सुनील मोरे भाजपच्या वाटेवर असून त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शहर विकास आघाडीच्या माजी अकरा नगरसेवक व शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह ते भाजप पक्षप्रवेश करणार असल्याचे समजते.

याबाबत श्री. मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देत वेट अँड वॉच असे सांगत सावध पवित्रा घेऊन वेळ मारून नेली. त्यामुळे श्री. मोरे यांच्या भाजपपक्ष प्रवेश जवळजवळ निश्चित झाल्याने सटाणा शहरास चर्चेला उधाण आले आहे. (Former Mayor More will soon join BJP with his supporters at satana Nashik Political News)

श्री. मोरे यांचा दोन वर्षांपासून दिल्ली, नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे असा धावता दौरा चालू असल्याने पक्षप्रवेशाबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

पूर्वाश्रमीचे समता परिषदेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख व माजी मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मोरे यांनी पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून सर्वच मातब्बरांना धोबीपछाड देत निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली होती.

भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय राज्यमंत्री व धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याशी असलेल्या जवळकीमुळे श्री. मोरे यांनी सटाणा शहराच्या इतिहासात कोट्यवधींची विकास कामे खेचून आणली.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

BJP
Ashram School : 20 वर्षांपासून इमारती अभावी भरतेय आश्रमशाळा! शाळा स्थलांतरित केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

निवडणूक या ना त्या कारणाने लांबत असल्याने श्री. मोरे यांच्या पक्षप्रवेशाच्या अनेक वावड्या उठत राहिल्या. आता मार्च २०२३ या चालू महिन्याच्या शेवटी मोरे भाजप प्रवेश करणार असून त्यांच्यासह शहर विकास आघाडीचे ११ नगरसेवक व शेकडो समर्थक कार्यकर्ते असा हा प्रवेश सोहळा निश्चित झाला आहे.

भाजपाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा घ्यावा असे राज्य कार्यकारिणीचे म्हणणे आहे. मात्र हा प्रवेश सोहळा सटाणा शहरातील पाठक मैदानावर एका भव्य दिव्य कार्यक्रमातच व्हावा असा हट्ट मोरे यांच्या निकटवर्तीयांनी धरल्याने तूर्त हा पक्षप्रवेश लांबल्याचेही त्यांच्या समर्थकांमध्ये बोलले जात आहे.

BJP
Maharashtra Politics: शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील 9 नेत्यांचं पंतप्रधान मोदी यांना पत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.