Market Committee Election : जि. प.च्या माजी सदस्यांचाही डंका; सदस्य पोचले बाजार समितीच्या सभागृहात

Market Committee nashik
Market Committee nashikesakal
Updated on

Nashik News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या माजी सदस्यांनी जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणूक रिंगणात उड्या घेतल्या. त्यात एक डझनहून अधिक माजी सदस्य विजयी होत थेट बाजार समितीच्या सभागृहात पोचले आहेत. काही सदस्यांना मात्र पराभव पत्करावा लागला आहे. (Former Member of ZP also try their luck in market committee election nashik news)

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका गत सव्वा वर्षापासून लांबणीवर पडलेल्या आहेत. या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले अनेक माजी सदस्य बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात उतरत नशीब अजमावीत होते. चौदा बाजार समितीत जवळपास १८ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रिंगणात होते.

यात मोजक्या सदस्यांचा पराभव झाला. मात्र अनेकांना यात यश प्राप्त झाले आहे. यामध्ये पिंपळगाव बसवंत बाजार समितीत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार विजयी झाल्या आहेत. येथूनच अपक्ष म्हणून यतीन कदम यांनी बाजी मारली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी लासलगाव बाजार समितीत हॅट्‌ट्रिक साधली आहे. येथूनच माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी सदस्य डी. के. जगताप यांनी विजय प्राप्त केला आहे. जिल्हा परिषदेतील भाजपचे माजी गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॅा. सयाजी गायकवाड दोघेही वेगवेगळ्या पॅनलकडून विजयी झाले आहेत. माजी सभापती संजय बनकरांना येवल्यातून मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे. येथे माजी सदस्या सविता पवार यांना यंदा संधी मिळाली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Market Committee nashik
Market Committee Election Result : पिंपळगावला राष्ट्रवादीचाच गजर; यतीन कदमांचा झाला प्रवेश

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या धनश्री आहेर यांनी बिनविरोध निवडून येत बाजी मारली होती. दिंडोरी बाजार समितीत माजी सदस्य तथा मविप्रचे संचालक प्रवीण जाधव आणि पंचायत समिती माजी सदस्य श्याम बोडके, कळवण बाजार समितीत माजी सभापती रवींद्र देवरे आणि यशवंत गवळी, घोटी बाजार समितीत नेतृत्व करत असलेले माजी सदस्य तथा मविप्रचे संचालक अॅड. संदीप गुळवे, हरिदास लोहकरे विजयी झालेले आहेत. नाशिक बाजार समितीत माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, माजी सदस्य भास्कर गावित, विनायक माळेकर विजयी झाले आहेत. माजी सभापती दिलीप थेटे, माजी सदस्य उदय जाधव पराभूत झाले आहेत.

माजी आमदारही विजयी

बाजार समितीच्या रिंगणात विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनी पिंपळगावमध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. येथूनच माजी आमदार अनिल कदम प्रथमच निवडून आले आहेत. चांदवडमध्ये माजी आमदार शिरीष कोतवाल पुन्हा विजयी झाले आहेत. कदम, कोतवाल दोघेही जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देखील आहेत.

चुंभळे, जगताप दांपत्यांचाही जलवा

नाशिक बाजार समितीत माजी सभापती शिवाजी चुंभळे व त्यांची पत्नी माजी नगरसेविका कल्पना चुंभळे विजयी झाले आहेत. लासलगाव बाजार समितीत गत पंचवार्षिकमध्ये सुवर्णा जगताप यांनी सभापती म्हणून काम केले होते. यंदाच्या पंचवार्षिकमध्ये त्या आणि त्यांचे पती तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी. के. नाना जगताप या पती-पत्नींनी बाजी मारली आहे.

Market Committee nashik
Market Committee Election Result : नाशिकमध्ये देवीदास पिंगळेच! ‘आपलं पॅनलचे’ वर्चस्व कायम..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.