घोटी (जि. नाशिक) : महाविकास आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचे निवासस्थान नाशिक असल्याने आपण नाशिकला येण्याचे ठरवले आहे. यामुळे अनेकांनी देव पाण्यात ठेवले असतील, असा टोला लगावत देशाचा एकही रुपया खाऊ देणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर, असा इशारा माजी खासदार किरीट सोमय्या (Former MP Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकारला (MVA Government) दिला. (Former MP Kirit Somaiya criticize MVA Government)
घोटी येथील वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथे सेवा, सुशासन व गरीब कल्याण अभियान कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद मेळावा रविवारी (ता. ५) झाला. त्या वेळी ते बोलत होते. संघटनमंत्री सुनील बच्छाव, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, महिला जिल्हा उपाध्यक्ष सीमा झोले, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, महेश श्रीश्रीमाळ,अण्णासाहेब डोंगरे, संघटक तानाजी जाधव, सरचिटणीस कैलास कस्तुरे, संजय झनकर, रमेश परदेशी आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माफिया सेनेस टक्कर देण्यासाठी सक्षम असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. केदा आहेर यांनी केंद्रात भाजपच्या आठवर्षीय कारकीर्दवर बोलतांना भाजपने गरिबांना केंद्रबिंदू मानून विविध प्रकारच्या योजना राबविण्यावर भर दिल्याचे सांगितले.
खंडेराव झनकर, अण्णा पवार, प्रकाश सोनवणे, गोटू कुमट, सजन नाठे, अशोक पीचा, युवा मोर्चाचे योगेश चांदवडकर, रवींद्र गव्हाणे, मयूर परदेशी, निखिल हांडोरे, पालसिंग बंगड, जगन कस्तुरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सागर हांडोरे यांनी केले, तर आभार तानाजी जाधव यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.