येवला (जि.नाशिक) : ग्रामीण भागातील कोरोना (corona virus) रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने चिंता वाढत आहे. सायगावमध्ये (saygaon) अवघ्या चोवीस तासाच्या आत चार जणांचा मृत्यू (corona death) झाल्याने गावावर शोककळा पसरली असून, जणू मृत्यूचे भय इथले संपत नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. (Four died in twenty-four hours in Saigaon)
मरणाच्या भयाची चाहूल गडद
यामुळे ग्रामपंचायतीने बुधवारपासून पुढील आठ दिवस कडेकोट जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभरात जवळपास बारा जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ मे च्या सायंकाळपासून तर आज (ता. ३) दुपारपर्यंत चार जणांनी जीव गमावला आहे. शिवाय आजही कोरोना बधितांची संख्या गावात मोठी आहे. त्यामुळे सर्वानुमते जनता कॅर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या महामारीत पहिल्या लाटेत वर्षभरात दोन चार संशयित रूग्ण दगावले. मात्र, तेव्हा मरणाच्या भयाची चाहूल ऐवढी गडद वाटली नव्हती. कोरोनाची महामारी गावात नाही तर वाडी वस्तीवरच्या घरा- घराच्या उंबऱ्यापर्यंत येवून ठेपल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्फ्यूमध्ये सहभागी होऊन सहकार्य करा
ग्रामस्थांनीही गावाच्या हितासाठी कर्फ्यूमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते गणपत खैरनार यांनी केले. बैठकीस सरपंच अनिता खैरनार, अशोक कुळधर, गणपत खैरनार, रंजना पठारे, संदीप पुंड, दिपक खैरनार, भाऊसाहेब आहिरे, योगिता निघुट, अरविंद उशीर, दिनेश खैरनार, शरद लोहकरे, संतोष दौंडे, उल्हास उशीर, ग्रामसेवक प्रदीप बोडखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.(Four died in twenty-four hours in Saigaon)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.