Kirtan Mahotsav : नाशिकचे वैभव असलेल्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिरातील १९४८ सालापासून सुरू झालेल्या दररोजचे नित्य कीर्तन सेवेस ७५ वे वर्षे सुरू होत आहे, या निमित्ताने कीर्तन महोत्सव व नारद जयंती उत्सव ६ ते ८ मे या कालावधीत होणार आहे. (four half hundred kirtankar Kirtan Mahotsav in Sri Kalaram temple from tomorrow in Nashik news)
या महोत्सवात महाराष्ट्रातून साधारणपणे साडेचारशे ज्येष्ठ व श्रेष्ठ असे नामवंत कीर्तनकार उपस्थित राहणार असून कीर्तनकारांमधील नव्याने शिक्षण घेऊन धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी तत्पर असलेली अशी तरुण कीर्तनकार मंडळी या कीर्तन महोत्सवात कीर्तनाचे कार्यक्रम करणार आहे.
महोत्सवासाठी जगद्गुरू शंकराचार्य संकेश्वर करवीर पीठ स्वामीश्री सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती स्वामी हे अध्यक्ष पद भूषविणार आहेत.
कार्यक्रमाचा तपशील-
६ मे (शनिवार) : सकाळी सात वाजता श्रीराम पंचायतन व देवर्षी नारद महाराज पूजनाने कार्यक्रमाची सुरवात होईल. त्यानंतर नऊ वाजता नारद गीत गायन, श्री गुरुवाणी या पुस्तकाचे प्रकाशन व महोत्सवाचे उद्घघाटन होईल.
साडेदहा वाजता मंगला चरणाचे कीर्तन हभप शशिकांत महाराज उत्पात (पंढरपूर) यांचे कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता देवर्षी नारद चरित्र यावर त्र्यंबकेश्वरचे हभप वेदमूर्ती संकेत शास्त्री दीक्षित यांचे प्रवचन होईल.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
७ मे (रविवार) : सकाळी साडेआठ वाजता आळंदी देवाची येथील हभप यशोधन महाराज साखरे यांचे प्रवचन होईल. सकाळी दहा वाजता कीर्तनाची गणुदासी परंपरा या विषयावर हभप डॉ. प्रज्ञा देशपांडे (पुणे) यांचे कीर्तन होईल.
दुपारी ३.३० वाजता कीर्तनाची नारदीय परंपरा या विषयावर हभप मकरंदबुवा करंबेळकर (पुणे) हे मार्गदर्शन करतील..
८ मे (सोमवार) : सकाळी आठ वाजता मिरज येथील समर्थ भक्त हभप कौस्तुभ बुवा रामदासी यांचे कीर्तन होईल. सकाळी दहा वाजता कीर्तनाची नारदीय परंपरा या विषयावर हभप सायली मुळे-दामले (रत्नागिरी) यांचे कीर्तन होईल.
दुपारी साडेतीन वाजता कीर्तनाची नारदीय परंपरा या विषयावर हभप गौरी खांडेकर (मुंबई) यांचे कीर्तन होईल. सायंकाळी साडेसात वाजता पैठण येथील हभप पुष्कर महाराज गोसावी यांचे वारकरी परंपरेतील काल्याचे कीर्तन होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.