Nashik Crime News: कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या; चौघेही संशयित सराईत गुन्हेगार

नाशिक-पुणे महामार्गावर युवक-युवतीला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने हिसकावून लुट केल्याची घटना घडली.
four robbers were jailed by police Nashik Crime News
four robbers were jailed by police Nashik Crime News
Updated on

Nashik Crime News : नाशिक-पुणे महामार्गावर युवक-युवतीला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने हिसकावून लुट केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासानुसार चौघांना अवघ्या काही तासात जेरबंद केले आहे.

संशयित चौघेही सराईत गुन्हेगार असून, त्यापैकी दोघे नुकतेच जामीनावर कारागृहातून बाहेर आले आहेत. (four robbers were jailed by police Nashik Crime News)

निलेश श्रीपाद उफाडे (२०), ऋषिकेश संजय पवार (१९), अमन सलिम सय्यद (२०), गोपाळ संतोष मोरे (२०, सर्व रा. मायको हॉस्पिटलजवळ, दिंडोरी रोड) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

सुजाता भाऊसाहेब गवळी (रा. शिवाजी चौक, सिडको) या युवतीच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवार (ता. २२) मध्यरात्रीच्या सुमारास ती मित्र गणेश गुप्ता याच्यासमवेत नाशिक-पुणे महामार्गावरील आलमगीर मोटार गॅरेजजवळ असताना संशयितांनी त्यांना अडविले.

धारदार कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील ११ हजार २०० रुपयांचे मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज बळजबरीने काढून घेत यांची लुटमार केली. याप्रकरणी सुजाता हिने मुंबई नाका पोलिस ठाणे गाठून तक्रारी दिली असता, जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

four robbers were jailed by police Nashik Crime News
Nashik Crime: रुग्णालयात घुसून तरुणावर कोयत्याने वार; मालेगावला सामान्य रूग्णालयातील प्रकार

सदरील गुन्ह्याचा तपास करताना सहायक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी यांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये चौघे संशयितांचा वावर आढळून आला असता, त्यानुसार पोलिसांनी दिंडोरी रोडवरील मायको हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

चौघांविरोधात पंचवटी पोलिसात मारहाणीसह चोरी, जबरीचोरीचे गुन्हे दाखल असून, यापैकी दोघे नुकतेच एका गुन्ह्यातून जामिनावर कारागृहातून बाहेर आलेले होते. चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना येत्या २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयितांकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. सहायक निरीक्षक मन्सुर तपास करीत आहेत.

four robbers were jailed by police Nashik Crime News
Nashik Crime News : गोळीबार प्रकरणाचे गुढ कायम; सहायक आयुक्त करणार स्वतंत्र चौकशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.