दैव बलवत्तर म्हणून ओतूरचे चौघे बचावले; कारमधील मोरेंनी सांगितली आपबिती

tractor accident
tractor accidentesakal
Updated on

कळवण (जि. नाशिक) : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आज (ता. २) तालुक्यातील ओतूरवासियांना आला. मुळाणे बारीत झालेल्या दुर्दैवी घटनेत (accident) ओतूर येथील चार जण दैव बलवतर म्हणून बचावले. (four saved in tractor accident at mulane bari Nashik News)

मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मुळाणे बारी येथे भीषण अपघात झाला. या अपघातात ओतूरकडून वणीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला जोडलेली दुसरी ट्रॉली वणीकडून ओतूरकडे जाणाऱ्या मारुती अल्टो कारला धडकून उलटल्यामुळे या अपघातात कारमधील ओतूर येथील प्रगतिशील शेतकरी व भाजपचे दादाजी पुंडलिक मोरे, सरलाबाई पुंडलिक माळी, अंजनाबाई पुंडलिक माळी व दशरथ पुंडलिक माळी (चालक) हे किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावले. ओतूर येथील दादाजी मोरे कुटुंबीय निफाड तालुक्यातील धारणगाव (खडक) येथील प्रती गाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दत्त मंदिर देवस्थानचे दर्शन घेऊन वणीकडून मुळाणे बारीतून ओतूरकडे निघाले होते.

tractor accident
6 महिन्यांपासून वडाळा चौफुली रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

त्याच दरम्यान ओतूरकडून वणीकडे मुळाणेबारीतून जाणारा ट्रॅक्टर भरधाव वेगाने येत असल्याचे बघून समोरुन येणाऱ्या ओतूरच्या मोरे यांच्या कारचालकाने प्रसंगवधान राखून कार रस्त्याच्या बाजूला उभी करुन घेतली. ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरला जोडलेली दुसरी ट्राली अल्टो कारवर आदळली. परंतु, दैव बलवतर म्हणून मोरे कुटुंबीय वाचले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ट्रॅक्टरमधील सहा जणांचा जागीच मृत्यू होऊन १० ते १६ जण जखमी झाले.

tractor accident
साल्हेर भागात कैऱ्या उतरविण्याची शेतकऱ्यांची लगबग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.