मनमाड (जि. नाशिक) : येथील बाल सुधारगृहात पुन्हा एकदा अक्षम्य बेपर्वाईचे प्रकरण समोर आले आहे. चार संशयित मुलांनी निरीक्षकावर हल्ला करत सुधारगृहातून पलायन केल्यानंतर अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. सुधारगृह वरिष्ठांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्याची गरज आहे.
येथील कॅम्प भागातील बाल सुधारगृहातून शुक्रवारी (ता. २९) चार अल्पवयीन संशयित मुले पळाली. सदर गुन्हेगार नाशिक येथील गंभीर गुन्ह्यातील असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शोधासाठी पथके रवाना केली. मात्र, कुठलाही थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, सुरक्षारक्षक तैनात असताना हा प्रकार घडलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बालसुधारगृहातील बेपर्वाईच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. मात्र, येथील व्यवस्था सुधारण्यात आलेली नाही. या प्रकरणावर संबंधित अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.
संशयित फरार झाल्यानंतर बालसुधारगृह प्रशासनाने तातडीने पोलिसांना कळविणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता सुधारगृह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसभर त्यांचा शोध घेतला. त्यानंतर कोणीच हाती न लागल्यामुळे अखेर रात्रीच्या सुमारास पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.