Nashik News : ZP समाजकल्याण अतंर्गत मागासवर्गीय 80 लाभार्थ्यांना चारचाकी!

ZP Nashik news
ZP Nashik newsesakal
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे ८० मागासवर्गीय लाभार्थ्यांना चारचाकी वाहनांचे वाटप करण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देखील दिले जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन येथे गुरूवारी (ता.९) हे वाटप केले जाणार आहे अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी दिली. (Four wheelers for 80 backward class beneficiaries under ZP Social Welfare Nashik News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

ZP Nashik news
नारोशंकराची घंटा : अतिशहाणे, सुशिक्षित असेच

२०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता या योजनेसाठी एक कोटी साठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या २० टक्के मागासवर्गीय सेस निधीतून बेरोजगारांना मालवाहतूक करणारे चार चाकी वाहन घेण्यासाठी दोन लाख रुपयांचा निधी दिला जातो.

प्रशासकीय मंजुरी आदेशातील अटी शर्ती व निकषांप्रमाणे संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडून शिफारसीसह पात्र लाभार्थ्यांच्या याद्या समाज कल्याण विभागाला पाठवण्यात आल्या होत्या.

याबाबत समाज कल्याण विभागाने २३ नोव्हेंबरच्या बैठकीत सोडत पध्दतीने लाभार्थ्यांची निवड केली होती. तालुकानिहाय लाभार्थी असे ः बागलाण (७), चांदवड (६), देवळा (२), दिंडोरी (६), इगतपुरी (६), कळवण (४), मालेगाव (७), नांदगाव (७), नाशिक (७), निफाड (६), पेठ (३), सिन्नर (७), सुरगाणा (१), त्र्यंबकेश्वर(४) व येवला (७)

ZP Nashik news
Nashik Bribe Crime : बारचालकांकडून हप्ते वसुली करताना एक्साईजचे तिघे लाचखोर जेरबंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.