नाशिक महापालिकेची बनावट वेबसाईट? नागरिकांची फसवणूक

nashik muncipal corporation
nashik muncipal corporationesakal
Updated on

नाशिक : महापालिकेकडे (nashik muncipal corporation) ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी बनावट संकेतस्थळावरुन एकाला २५ हजाराला गंडाविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. योगेश पाटील असे तक्रारदारांचे नाव असून त्यांना बनावट संकेतस्थळावरुन भामट्याने सुमारे २५ हजाराला गंडविले. अशी त्यांची तक्रार आहे. नेमका प्रकार काय? (fraud-case-from-fake-website-of-NMC-nashik-marathi-news)

महापालिकेच्या बनावट संकेतस्थळावरुन नागरिकांना गंडा

तक्रारदार योगेश शांताराम पाटील हे पंचवटीतील दिंडोरी रोड वरील निर्सगनगर येथील चंपाकुंज अपार्टमेंट येथील रहिवाशी आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या अपार्टमेंट समोरील ड्रेनेज चोक झाल्याने त्यांनी ऑनलाईन तक्रारीसाठी NNC grievance या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदविली. त्यानंतर त्यांना ९७०७७५१३५५ या मोबाईलवरुन फोन आला. त्यानंतर customer care Helpline या नावाने नोंदणीकृत असून पुढील ७२ तासात तक्रार निवारण होईल. असे सांगून तक्रार निवारणासाठी www.consumerclaimpayment.com या लिंकवर २० रुपये शुल्क भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर दोन टप्प्यात बॅकेच्या खात्यातील २८ हजार ७७८ रुपये परस्पर काढून घेण्यात आले.

माझी ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मी स्थानीक पंचवटी पोलिस ठाणे व सायबर पोलीस ठाण्यात जाउन संबधित प्रकाराची तक्रार केल्यानंतर त्यांना महापालिकेचे संबधित संकेतस्थळ बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संबधित महापालिकेचे बनावट संकेतस्थळ त्वरीत बंद करावे. - योगेश शांताराम पाटील (तक्रारदार, पंचवटी)

nashik muncipal corporation
आता डेल्टा प्लसच्या रूपाने कोरोनाचे आव्हान - भुजबळ
nashik muncipal corporation
आमदारांच्या कन्येची आर्थिक फसवणूक; नाशिकमधील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()