Nashik Crime : शहरातील स्टेट बँक चौकात जैन मंदिराजवळ ई शॉपी (किराणा व इतर) सामानाचे दुकान थाटून नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील रहिवासी व सेल्समन राजेंद्र सुरसे यांनी शेकडो लोकांकडून पैसे घेऊन या ई-शॉपीचे सभासद करून घेतले.
सभासदांना सर्व खरेदीवर ३५ टक्के भरघोस सूट देण्याचे आश्वासन देत दुकान बंद करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सभासदांची निश्चित संख्या समजू शकली नाही.
फसवणुकीच्या या प्रकारामुळे सभासद हवालदील झाले आहेत. यातील फसवणूक झालेल्या काही सदस्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांना निवेदन देत तक्रार केली. (Fraud in name of e shop in Malegaon Complaint to Upper Superintendent of Police Bharti Nashik Crime)
ई-शॉपीचे सभासद होण्यासाठी किमान रक्कम तीन रुपये तर जास्तीत जास्त रक्कम नऊ हजार घेऊन सभासद नोंदणी करण्यात आली. या पद्धतीने शहरातून सुरसे याने लाखो रुपये गोळा केले. गेल्या दीड वर्षांपासून येथील शॉपी बंद करून सुरसे हा फरार झाला.
पाठोपाठ दुकानही बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे सभासदांच्या निदर्शनास आले. यानंतर काहींनी सुरसे याच्याशी फोनवर संपर्क केला असता पैसे परत करण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली.
तर काहींना संबंधित कंपनीशी संपर्क करून आपल्या सर्वांचे पैसे परत करण्याचे खोटे आश्वासन दिले. आता तर सुरसे हा फोन देखील घेत नाही. फोन उचलला तर उडवाउडवीची उत्तरे देऊन धमक्याही देतो.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
लाखो रुपये घेऊन दुकान बंद
ई-शॉपी संचालक व सेल्समन राजेंद्र सुरसे यांनी आमिष दाखवून हजारो सामान्य लोकांचे लाखो रुपये घेऊन दुकान बंद करून पोबारा केला आहे.
सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या दोघांविरोधात कठोर कारवाई करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांना देण्यात आले. यावेळी तुकाराम साबणे, प्रकाश खैरनार, सहदेवकुमार वरखेडे, विवेक बागूल, शोभा जाधव आदी फसवणूक झालेले सभासद उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.