महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याकडून 22 लाखाचा अपहार | Nashik

fraud of 22 lakhs from female employee of  Nashik NMC Nashik News
fraud of 22 lakhs from female employee of Nashik NMC Nashik Newsesakal
Updated on

नाशिकरोड : महापालिकेच्या (NMC) नाशिकरोड विभागीय कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने सुमारे २२ लाख रुपयाचा अपहार (Fraud) केल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेचे अधिकारी राकेश बाळकृष्ण पवार यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

fraud of 22 lakhs from female employee of  Nashik NMC Nashik News
गरमी में ठंडी का एहसास; तरण तलावात जलतरणपटूंसह हौशींची गर्दी

१६ जून २०२० ते ८ मार्च २०२२ दरम्यान नाशिकरोड विभागीय कार्यालयात (nmc Nashik Road Divisional Office) कार्यरत कर्मचारी सुषमा प्रेमजी जाधव यांनी चेहेडी भरणा केंद्र बंद असतानादेखील नाशिकरोड विभागीय कार्यालय भरणा केंद्रात चेहेडी केंद्राचा पासवर्ड व यूजर आयडी गैरवापर केला. दैनंदिन पावत्या संलग्न संगणकीय प्रिंटेड स्टेशनरी व इत्यादी मौल्यवान दस्तऐवजाचा गैरवापर करून वर्ग ४ कर्मचारी त्यांची जबाबदारी नसताना पावत्यांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. एकूण रक्कम रुपये २१ लाख ७९ हजार ८६२ रुपयांचा अपहार करून महापालिकेची फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनंतर नाशिकरोड पोलिसांनी महापालिकेच्या महिला कर्मचारी जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

fraud of 22 lakhs from female employee of  Nashik NMC Nashik News
नाशिक : नवनियुक्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्वीकारला पदभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.