Nashik Crime News : बनावट दस्तऐवजाच्या आधारे सव्वा कोटीची फसवणूक

Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील व्यापाऱ्याची जमीन खरेदी-विक्री व्यवहारात बनावट दस्तऐवज दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. यात जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांची टोळी कार्यरत आहे.

वासुदेव शिर्के हा या टोळीचा सूत्रधार आहे. येथील मोहम्मद इब्राहिम मोहम्मद शब्बीर (४८, रा. इस्लामपुरा) यांची नऊ जणांनी संगनमताने सुमारे सव्वा कोटी रुपयांची जमीन खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केली.

याप्रकरणी शिर्के विरुद्ध फसवणुकीचा चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसेंदिवस या प्रकरणातील फसवणूक झालेल्यांची संख्या वाढत आह. (Fraud of 50 crores on basis of fake documents Nashik Crime News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Fraud Crime
Mumbai Crime News : दुचाकीस्वारांची वाहतूक हवालदाराला मारहाण

मोहम्मद इब्राहिम यांनी दिलेल्या तक्रारीत संशयितांनी सायने खुर्द येथील गट नं. ९७ मध्ये शेत जमिनीच्या मुळ मालकाकडून सौदा झाल्याचे दाखविण्यात आले. मोहम्मद इब्राहिम यांना बनावट दस्तऐवजाच्या आधारे, खोट्या टायटल व्हेरीफिकेशन नोटीस दाखवून, बनावट ना हरकत दाखला दाखविण्यात आला.

शेत जमिनीसाठी दोन कोटी ६० लाख रुपयाचे बनावट दस्तऐवज बनवून दिले. त्यांच्याकडून १८ लाख रुपयाचा सौदा झाला. तसेच एक कोटी १३ लाख रुपयाचा प्लॉट नं. १० च्या भरणापोटी दिली. एकूण एक कोटी २४ लाखाचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. १३ जूनपासून ते ३ ऑगस्टपर्यंत वेळोवेळी फसवणूक केली आहे.

या संदर्भात वासुदेव प्रकाश शिर्के, शकील अहमद नजीर अहमद ऊर्फ शकील हिरो, अमीन खान शब्बीर खान ऊर्फ आमीन कलेजी, डॉ. इब्राहीम शाह, सुनील प्रकाश अहिरे, प्रशांत महावीर अहिरे, नीलेश भगवान सोनवणे, अब्दुल लतीफ मोहंमद शरीफ, मुद्दसीर हुसेन अब्दुल रहेमान या नऊ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Fraud Crime
Jalgaon Fraud Crime : केंद्र सरकारच्या नावे फसवणुकीचा धंदा; मस्कावदच्या संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.