Nashik Fraud Crime : बांधकाम साहित्य विक्रेत्याची सव्वा लाख रुपयांची फसवणूक

Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : शहराजवळील सोयगाव शिवारातील तुलसी स्टील सेंटरचे संचालक आशितोष देवरे, प्रभाकर देवरे (रा. मधुबन हॉटेलशेजारी) या बांधकाम साहित्य विक्रेत्यांची तिघा संशयितांनी संगनमत करुन सुमारे सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. न्यायालयाच्या आदेशावरुन छावणी पोलिस ठाण्यात प्रभाकर देवरे यांच्या तक्रारीवरुन तिघा संशयितांविरुद्ध फसवणूक व ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud of construction material seller of one half lakh Nashik Fraud Crime)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Fraud Crime
District Labor Federation Election : येवल्यात भुजबळ-दराडे, तर सिन्नरमध्ये कोकाटे-वाजे सामना

याबाबत माहिती अशी की, देवरे पिता- पुत्रांचे सोयगाव शिवारात तुलसी स्टील सेंटर हे बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान आहे. अशोक मोहिते (वय ३२, रा. म्हसरुळ, ता. जि. नाशिक) याने त्यांच्या दुकानातून एक लाख २५ हजार ५३० रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य खरेदी केले. पैसे आणून देतो, असे सांगून मुळात देवरे यांना पैसेच अदा केले नाही. जुलै २०२२ मध्ये हा प्रकार घडला. याउलट अशोकने हे बांधकाम साहित्य मोहम्मद आलम (वय ३३) व मोहम्मद कासिम (वय ३५) या दोघांना विक्री केले.

आलम व कासिम यांना हे साहित्य पैसे न देता फसवणूक करुन आणल्याची माहिती होती. तरीदेखील दोघा संशयितांनी त्याची खरेदी केली. सव्वा लाख रुपये फसवणूक झाल्याप्रकरणी श्री. देवरे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन आदेशानंतर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

Fraud Crime
Nashik News: भाजी बाजार ठरतोय हप्ता वसुली केंद्र; राजेंद्र कॉलनीतील रहिवाशांचा 15 वर्षापासून लढा सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.