Nashik Cyber Crime: जादा परताव्‍याचे आमिष दाखवीत ज्येष्ठ नागरिकांची लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या परताव्‍याचे आमिष दाखवीत फसवणूक केल्‍याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे.
Cyber crime
Cyber crimeesakal
Updated on

नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या परताव्‍याचे आमिष दाखवीत फसवणूक केल्‍याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी ज्‍येष्ठ नागरिकाने यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पावणे नऊ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्‍याचे म्‍हटले आहे. (Fraud of lakhs of senior citizens with lure of excessive returns share market Nashik Cyber ​​Crime)

गेल्‍या काही दिवसांमध्ये शेअर मार्केटच्‍या नावावर फसवणुकीचे प्रकार शहर परिसरातून समोर येत आहेत.

जादा परताव्‍याचे आमिष दाखवत भामट्याकडून फसवणूक केली जात असून, यामध्ये ज्‍येष्ठ नागरिकांना टार्गेट केले जात असल्‍याचे समोर येते आहे. फसवणुकीची नुकतीच आणखी एक घटना उघडकीस आलेली आहे.

Cyber crime
Dharashiv Crime News : दोन घरफोड्या; दहा लाखांचा मुद्देमाल चोरीला

सुनील दत्तात्रेय बागूल (वय ६७, रा.दिंडोरीरोड, म्‍हसरुळ) यांना संशयित पियुष शर्मा, राघव शर्मा, विवेक जोशी, संजय कुमार नामक भामट्यांनी मोबाईल क्रमाकांवरुन संपर्क साधत ऑनलाइन आर्थिक फसवणूक करून त्‍यांच्‍या बँक खात्‍यात रक्‍कम जमा करून घेतली.

१८ सप्‍टेंबर ते १४ ऑक्‍टोबर २०२३ या कालावधीत तब्‍बल ८ लाख ७५ हजार ४९४ रुपयांची फसवणूक झाल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यामार्फत तपास केला जातो आहे.

Cyber crime
Dhule Crime News : मोहाडी उपनगरात एकाच रात्री चोरीसत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.