Nashik Fraud Crime: कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक

Crime
Crimeesakal
Updated on

मनमाड : एक कोटीचे कर्ज काढून देतो, असे सांगून कर्जापोटी ३२ लाख रुपये घेतल्याची घटना मनमाडला घडली असून, या प्रकरणी मनमाड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. (Fraud with lure of loan waiver Nashik Crime)

Crime
Nandurbar Crime: नंदुरबार हादरले! मुख्य चौकात तरुणाचा खून; पोलिसांचा कडक बंदोबस्त

याप्रकरणी मुराद हरून शेख यांनी इरफान उस्मान सय्यद (रा. नाशिक) यांच्याविरोधात मनमाड पोलिसांत फिर्याद दिली. संशयिताने शेख यांचा विश्वास संपादन करून त्यांना एक कोटीचे कर्ज काढून देतो, असे आमिष दाखवून त्यासाठी त्यांच्याकडून टप्प्याटप्याने बँक अकाउंटद्वारे १६ लाख रुपये तसेच रोख स्वरूपात १६ लाख अशी एकूण ३२ लाख एवढी रक्कम घेतली व कर्ज काढून न देता सदर रक्कम परत न करता त्या पैशांचा अपहार केला.

तसेच फिर्यादींनी कर्जासाठी बँकेत देण्यासाठी सिक्युरिटी म्हणून दिलेला कोरा धनादेश स्वतःचे नावे टाकून वटवण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Crime
Crime: किरकोळ वादातून मालाडमध्ये तरुणाची हत्या; रहिवाशांनी केली पोलिसांवर दगडफेक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.