निसर्गोपचारांमुळे रोगांपासून मुक्तता : पोलिस आयुक्त दीपक पांडे

Deepak Pandey
Deepak Pandeyesakal
Updated on

ठेंगोडा (जि. नाशिक) : उच्च रक्तदाब, मधुमेह, इतर जीवनशैलीच्या निगडित सर्व रोगांपासून पूर्णपणे मुक्ती हवी असेल तर निसर्गोपचार पद्धती अवलंबून तिच्या सानिध्यात राहावे लागेल, असे प्रतिपादन नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांनी केले.

ठेंगोडा ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी (ता. १९) पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय (Nashik Police Commissioner Deepak Pandey), लोहोणेरचे सुपुत्र यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) उत्तीर्ण झालेले सुदर्शन सोनवणे व सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत मोरे यांचा नागरीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार दिलीप बोरसे, सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत मोरे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, मविप्रचे संचालक डॉ. प्रशांत देवरे, लोहोणेरचे सुपुत्र यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले सुदर्शन सोनवणे, पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, यशवंत पाटील, दिलीप अहिरे, रामचंद्र जाधव, भुवलसिंग, संजय पांडे, संजय लोखंडे, राहुल देवरे उपस्थित होते.

Deepak Pandey
नाशिक : यंदा पोषक वातावरणामुळे आंब्याची झाडे बहरली

श्री. पाण्डेय म्हणाले, आपले शरीर पंचमहाभूतांनी (आकाश, वायू, पृथ्वी, जल, अग्नी) पासून बनलेले असून, पंचमहाभूतांचे मूळ सिद्धांत यापासून दूर गेल्यामुळे शरीरामध्ये रोगाची लागण होते. कोविडची परिस्थिती पाहता शरीरामध्ये पूर्वीपासून असलेल्या आजारामुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात व त्यामुळे विशेष गंभीर परिस्थितीमध्ये व्यक्तीचा मृत्यू होण्याचा संभव असतो, हे आपण कोरोना परिस्थितीमध्ये बघितलेले आहे. सध्या जगभरात रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड, संधिवात अशा विविध आजारानी लोकांना ग्रासले आहे. यास बदललेली जीवनशैली कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गोपचार व प्रकृती नियमाने चालल्यास सर्व रोगांपासून निश्‍चितच मुक्तता मिळेल, असे श्री. पाण्डेय यांनी नमूद केले.

Deepak Pandey
पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे समपातळी सर्वेक्षण तत्काळ करा

सरपंच नारायण निकम यांनी दीपक पाण्डेय (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांचा सत्कार केला. तर, लोहोणेरचे सुपुत्र यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले सुदर्शन सोनवणे यांचा सत्कार पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी केला. डॉ. प्रशांत देवरे यांनी प्रास्ताविक केले. उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी श्री. पाण्डेय यांचा परिचय करून दिला.

Deepak Pandey
नाशिक : आदिवासी कुटुंबातील लेकरांना मदतीचा हात

या वेळी लोहोणेर, ठेंगोडा येथील ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मोरे, भरत धनवटे, दौलत पगारे, सतीश देशमुख, कचरलाल बागडे, निंबा धामणे, योगेश पवार, शांताराम वाघ, राजेंद्र अलई, तुळशीदास शिंदे, डी. के. अहिरे, आण्णा पगारे, गावातील जेष्ठ नागरिक महिला ,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्र संचलन निखिल रोकडे, आभार यशवंत पाटील यांनी केले.

Deepak Pandey
नाशिक : 4 वाहनांचा विचित्र अपघात; चौघे गंभीर जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.