Ganeshotsav 2023: संपूर्ण गणेशोत्सव काळामध्ये मंडळांना मोफत प्रसाद वाटप; सटाण्याच्या जाधव पतीपत्नींचे कौतुक

Sanjay and Manisha Jadhav.
Sanjay and Manisha Jadhav.esakal
Updated on

Ganeshotsav 2023 : रोजीरोटीसाठी राब राब राबतानाही आपल्या कमाईचा काही हिस्सा देवधर्मावर खर्च करण्याच्या पवित्र हेतूने प्रेरित होऊन गणेशोत्सवात विविध लहान मोठ्या मंडळांना मोफत प्रसाद पुरविणारा एक अवलिया सटाणा शहर आणि परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (Free prasad distribution to mandals throughout Ganeshotsav 2023 period Appreciation of Satane Jadhav husband and wife)

त्याचे नाव आहे संजय बाबूराव जाधव (अहिल्याबाई चौक). संजयचे येथील चित्रा सिनेमागृहासमोर भेळभत्ता विक्रीचे एक छोटेसे टपरीवजा दुकान आहे. दुकानावर पत्नी मनीषा सोबत दोघेजण चहा, वडापाव, पाववडा, भेळभत्ता विक्रीचा छोटेखानी व्यवसाय करतात.

गणेशोत्सवात या जोडप्याने शहरातील दहा ते पंधरा लहान मोठ्या गणेश मंडळांना दररोज मागणीप्रमाणे ५१/१०१/१५१/२०१ बुंदीचे लाडू मोफत पुरविण्याचे व्रत सुरू केले. सकाळपासूनच जाधव दाम्पत्य व्यवसायाबरोबरच गणपतीचा हा प्रसाद बनवण्याचे काम सुरू करायचे.

मंडळांनी फक्त फोनवर त्यांना आपल्याकडील मंडळासाठी अमूक इतके लाडू पाहिजेत असा निरोप दिला, की सायंकाळी सातला एका बॉक्समध्ये त्या मंडळांचा प्रसाद तयार असे. असा उपक्रम गणेशोत्सवात चालला.

मात्र या धार्मिक कार्याची कुठेही वाच्यता झाली नाही. काही मंडळांनी संजय यांच्या या दानशूर उपक्रमाची दखल घेऊन त्याच्या हस्ते सपत्नीक गणरायाची आरती सुद्धा करून घेतली. काही गणेशभक्तांनी त्यांना मोबदल्यात रक्कम देऊ केली होती.

Sanjay and Manisha Jadhav.
Ganeshotsav 2023: मालेगावात 10 तास मिरवणूक! बारानंतर वाजंत्री बंद; पहाटे पावणेचारला शेवटच्या बाप्पाला निरोप

गेल्यावर्षी आपल्या कमाईवर संजूने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शहरात संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज नावाने विनामूल्य अभ्यासिका सुरू केली.

शहरात गणेशोत्सव रमजान व इतर सण उत्सवाच्या बंदोबस्तासाठी येणारे शेकडो पोलिस, होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या जवानांना जेवण पुरविण्याचे कामही ते करतात.

अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी केंटचे पाणी, मुला-मुलींची स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, स्टडी चेअर, कपाट, संडास- बाथरूम, इलेक्ट्रिकल दुचाकी व मोबाईल चार्जिंग पॉईंट दिले आहेत.

सर्वच दैनिके, पाक्षिके, मासिके, स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे पुस्तके, संदर्भ ग्रंथ अभ्यासिकेत ठेवण्यात आले आहेत. स्वतःची हजेरी स्वतः भरणे, दिवस मावळायच्या आत आपापल्या घरी जाणे हा येथील अलिखित नियम आहे.

सर्व झाडलोट, संडास बाथरुम धुणे, फरशी साफ करण्याचे काम संजय यांच्या पत्नी मनीषा करतात. संजय यांचा एकुलता एक मुलगा नीलेश दिल्लीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे.

Sanjay and Manisha Jadhav.
Ganeshotsav 2023: 'जपान’ मध्ये गणरायाचा मराठी माणसाकडून 'डंका'! विसर्जनाला वाजत गाजत मिरवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.