Nashik News: आभासी जगतातील मित्रांचा मेळा यंदा सांगोल्यात! भेटीगाठी खाद्य संस्कृतीसह मनोरंजनाचा खजिना

Mithilesh Desai had distributed 2000 hemp plants at the hands of entrepreneur Praveen Gaikwad at the party trust meeting held here last year.
Mithilesh Desai had distributed 2000 hemp plants at the hands of entrepreneur Praveen Gaikwad at the party trust meeting held here last year.esakal
Updated on

चांदोरी : आपण सर्वजण आपापल्या क्षेत्रात काम करीत असतानाच सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. आपल्या व्यक्त होण्याच्या कलागुणांमुळे सोशल मीडियावर अनेक नवनवीन मित्र आपल्याशी जोडले जातात.

आपण एकमेकांना ओळखतो, एकमेकांच्या सुख-दुःखाच्या क्षणांमध्ये सहभागी होतो. भले आपल्या सर्वांची सामाजिक, राजकीय, वैचारिक भूमिका काहीही असो; कुठेतरी मैत्रीचा एक समान धागा आपल्यात असतोच असतो.

परंतु, अनेकदा आपला हा सर्व मित्रपरिवार केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहतो. आभासी जगातला हा सगळा गोतावळा प्रत्यक्षरीत्या एकत्र आणून त्यांची भेट घडविण्यासाठी केलेला प्रपंच म्हणजे पार्टी ट्रस्ट मित्रमेळावा.

थोडक्यात गावाकडे कशा जत्रा असतात, तशी पार्टी ट्रस्ट मित्रमेळावा म्हणजे सोशलवरची जत्राच म्हणा हवं तर... अन ती जत्रा संपन्न होईल, रविवार, १ ऑक्टोबर यादिवशी. सांगोला (जि. सोलापूर) येथील रामकृष्ण गार्डन व्हीला येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ती संपन्न होणार आहे. (Friends of virtual world meet in Sangola this year treasure trove of entertainment along with food culture to visit Nashik News)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सात वर्षांपासून महाराष्ट्राच्या नगर, पुणे, बारामती, लातूर आदी ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये पार्टी ट्रस्ट मित्रमेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

केवळ सोशल मीडियावरील मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटीच नाही; तर त्यांना ज्या भागात आपण हा मित्रमेळावा आयोजित करतो, तिथल्या शाकाहारी/मांसाहारी जेवणाची चव, खासियत आणि ते जेवण बनविण्याची पद्धत या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्याचाही प्रयत्न या माध्यमातून असतो.

कार्यक्रम केवळ मौजमजेचा न राहता त्याला सामाजिक कर्तव्याची जोड म्हणून राज्यातील गरजवंत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनाचा खर्च पार्टी ट्रस्टचे सदस्य करणार असून, शाकाहारी-मांसाहारी जेवणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी सोशल मीडियावरील मित्रमैत्रिणींच्या आर्थिक सहकार्यातून पार पाडल्या जाणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mithilesh Desai had distributed 2000 hemp plants at the hands of entrepreneur Praveen Gaikwad at the party trust meeting held here last year.
Nashik News: डॉ. नानासाहेब परुळेकर यांना कुंचल्यातून रंगवंदना! कलाशिक्षक संजय जगताप यांनी रेखाटले चित्र

कार्यक्रमासाठी हजारांहून अधिक मित्र-मैत्रिणींनी नोंदणी करीत लोकांच्या प्रवेश शुल्कामधूनच शेतकऱ्यांना सामाजिक कर्तव्य मदतनिधी प्रदान करण्यात येतो.

सर्वांचा आर्थिक हातभार सत्कारणी लागावा आणि सर्वांना मनसोक्त भेटीगाठीचा, स्नेहभोजनाचा व मनोरंजनाचा निखळ आनंद घेता यावा, असे कार्यक्रमाचे स्वरूप असते.

या आभासी मेळाव्यात ऑनलाइन नोंदणी करीत जास्तीत जास्त सदस्यांनी उपस्थिती राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे प्रशांत भोसले, राम गोरड, प्रदीप कणसे, महेश ढोबळे, हर्षवर्धन मगदूम, अनिल माने, राजू शिंदे, प्रदीप मिसाळ, मल्हार गायकवाड, राजू मगर, दीपक वाडदेकर, संभाजी भोसले, श्याम कदम, संग्राम देशमुख यांनी केले आहे.

"आनंदाच्या क्षणी जसे आपण आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना पार्टी देतो, तसंच पार्टी ट्रस्ट महाराष्ट्रातील सर्व परिचित/अपरिचित मित्रमंडळींना खुले निमंत्रण देऊन मित्रमेळाव्याच्या माध्यमातून सोशल मीडियावरील मित्रमैत्रिणींना प्रत्यक्ष भेटता यावे, नवनवीन मित्र जोडता यावेत, एकमेकांमधील स्नेह वाढावा, यासाठी केलेला प्रयत्न आहे."

- राजेश चव्हाण (रेडगाव), सागर पोटे (कोठुरे)

Mithilesh Desai had distributed 2000 hemp plants at the hands of entrepreneur Praveen Gaikwad at the party trust meeting held here last year.
Tribal Development: जल आरक्षण- जल संवर्धन यात्रा सुरू; आदिवासी बांधवामध्ये होणार जल जागृती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.