नाशिक : मित्राच्या वडिलांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे डोळ्यादेखत मित्राच्या वडीलांचे निधन झालेले पाहून त्यांना मदत करणाऱ्या युवकांचा देखील हदयविकाराने मृत्यू झाला.
मित्राच्या वडिलांच्या मदतीसाठी स्वतः मुलासारखीच भूमिका निभावताना स्वतः मात्र जिवाला मुकल्याची हद्यद्रावक घटना सोमवारी (ता.१५) जेल रोडला घडली. या घटनेने जेल रोड परिसरात हळहळ व्यक्त होत असून वडिलांसोबत जिवलग मित्र गमावल्याने दु:खाचा दुहेरी डोंगर मित्रावर कोसळला.
विजय भगवंत जाधव (वय ७३, हरिस्नेह रो-हाऊस ययातीनगर) आणि अनिष देविदास नायर (३९ रा. गोसावी मळा, जेलरोड) अशी मृतांची नावे आहेत. (Friendship saved but life lost youth died his friends father died in front of his eyes Nashik News)
विजय जाधव हे जेल रोडला ययातीनगर भागात रहायला आहे. आज सोमवारी (ता.१५) दुपारी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने मुलगा निहान जाधव याने मित्र अनिष नायर याला घरी बोलावून घेतले होते. दोघा मित्रांनी तत्काळ रिक्षातून जाधव यांना बिटको रूग्णालयात दाखल केले.
मित्राच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत अनिष नायर याने स्वतः जाधव यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. मित्राच्या वडिलांच्या या सगळ्या शुश्रूषे दरम्यान त्याला मात्र अस्वस्थ वाटू लागले.
अस्वस्थ वाटू लागल्याने तो रुग्णालयाबाहेर पडला. प्रवेशद्वारातच ज्या रिक्षाने त्याने मित्राच्या वडिलांना आणले. त्या रिक्षाच्या दिशेने जात असताना त्यास उलटी झाली.
चालकाने त्यास रिक्षात विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने अनिष रिक्षात जावून बसला असता त्याच्या तोंडातून अचानक फेस येऊ लागल्याने रिक्षा चालकाने लगचे रुग्णालयातील डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तत्काळ त्याच्याजवळ पोचत त्यास तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
दुहेरी दुःखाचा डोंगर
पितृतुल्य मित्राच्या वडिलांच्या मृत्यूचा धक्का बसल्याने ही घटना घडली. पण त्याचवेळी वडिलांसोबत अडचणीत मदतीला धावून येणाऱ्या मित्रालाही गमावल्याने निहान जाधव याच्यावर दु:खाचा दुहेरी डोंगर कोसळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.