Shravan Adhik Maas: अधिकमासात जावईबापूंना धोंडफळ! 18 जुलैपासून अधिकच्या महिन्याला सुरवात

Adhik Maas 2023
Adhik Maas 2023 esakal
Updated on

Shravan Adhik Maas : दान, धर्मासाठी शुभ असणारा आणि जावईबापूंच्या स्वागताचा अधिक (धोंड्याच्या) महिन्याची वाट सासरचे पाहात असतात. हा महिना जावयांसाठी खास असतो.

सासरकडील मंडळी आपल्या ऐपतीनुसार जावईबापूला अनारशाचे धोंडे किंवा काही जण चांदीचे, तर कोणी सोन्याचे धोंडे (धोंडफळ) देतात. मुख्य लग्नसराई संपल्यावर आता धोंड्याच्या महिन्यामुळे सराफा बाजारातील कारागिरांच्या हाताला काम मिळाले आहे. (From July 18 month of shravan Adhik maas begins nashik)

तीन वर्षांतून एकदा येणारा हा अधिक मास. या महिन्यात जावईबापूंना सासरी बोलावून सोने, तांबे, चांदीच्या वस्तू दान दिल्या जातात. पंचपक्वान्नाचे जेवण ठेवले जाते. पुरणाच्या दिंडांना ‘धोंडा’ असे म्हटले जाते. त्यामुळे हा महिना धोंड्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो.

१९ वर्षांनंतर श्रावणात अधिकमास

दर तीन वर्षांनंतर अधिकचा महिना येत असतो. यामुळे यंदा १३ महिन्यांचे वर्ष असणार आहे. उल्लेखनीय म्हणजे तब्बल १९ वर्षांनंतर अधिक महिना श्रावण मासात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Adhik Maas 2023
Nashik Sharad Pawar : शरद पवारांचे येवल्यातील ‘आशीर्वाद’चे परिणाम असतील मोठे : रोहित पवार

धोंड्याच्या महिन्याला ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हणतात. श्रावणातील पहिला महिना म्हणजे १८ जुलै ते १६ ऑगस्ट हा ‘धोंड्या’चा महिना असणार आहे.

"धोंड्याच्या महिन्यात मागणी लक्षात घेता चांदी, सोन्याचे ताट अथवा लहान वाटी व धोंड्याला मागणी असते. लग्नाच्या पहिल्या वर्षी जावयाला दान देण्याची प्रथा आहे. दान देणे उत्तम कार्य, असे मानले जाते. त्यादृष्टीने आम्ही सोने, चांदीचे धोंडे तयार केलेले आहेत. यात चांदीचे धोंडे अधिक असतात."- नंदकुमार जंगम, सराफ असोसिएशन, पिंपळगाव बसवंत

Adhik Maas 2023
Amit Shah J P Nadda लॉन्च करणार नवे कँम्पेन टिफिन पे चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.