Nashik News: डाळिंबाने सफरचंदाला केले ओव्हरटेक; मालेगावात फळांची रेलचेल

Fruit trolleys at shops
Fruit trolleys at shops
Updated on

Nashik News: येथील बाजारात सध्या फळांची रेलचेल दिसत आहे. दिवाळी सणात फळबाजारही तेजीत आला आहे. सध्या डाळिंबाचे भाव तेजीत आहेत. किरकोळ बाजारात डाळिंब १८० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे.

सफरचंदाच्या किमती सामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. १०० ते १२५ रुपये किलोने सफरचंद मिळत आहेत. लालसर रंगाच्या द्राक्षांचा भाव किलोला तीनशे रुपये आहे. फळांची रेलचेल असली तरी पेरू, पपई, सफरचंद यांना सर्वाधिक मागणी आहे.

तालुक्यासह कसमादेत मोठ्या प्रमाणावर फळ शेती केली जाते. तेल्या व मर रोगाचा मुकाबला करत शेतकऱ्यांनी डाळिंब फुलविला आहे. (Fruit market boom during Diwali festival nashik news)

दिवाळी व छटपूजा या सणांमुळे दिल्लीसह उत्तर भारतात डाळिंबाला मागणी आहे. घाऊक बाजारात डाळिंबाचे भाव १४० ते १७० तर किरकोळ बाजारात साधारण प्रतीचा डाळिंब १८० ते २०० रुपये किलोने मिळत आहे.

उच्च प्रतीचा डाळिंब अडीचशे रुपयापर्यंत आहे. सफरचंदांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक वाढल्याने भाव सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. १०० ते १२५ रुपये किलोने सफरचंद मिळत असून आगामी काळात भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

येथील बाजारात ग्रामीण भागातील सीताफळ, पेरू, पपई, टरबूज आदी फळे विक्रीसाठी येत आहेत. कळवण भागातून स्ट्रॉबेरीची आवक आहे. सीताफळ ८० ते १०० रुपये, पेरू ७० ते ८० रुपये, लाल पेरू ८० ते १०० रुपये तर स्ट्रॉबेरी १७० ते २०० रुपये किलोने विकली जात आहे. चिकूची आवक चांगली असून भाव ८० ते १०० रुपयादरम्यान आहे.

Fruit trolleys at shops
Nashik Agriculture News: गळीत हंगामाची यंदा अग्नीपरीक्षा; पावसाअभावी उत्पादनात घट

अमर फळ- २००, आलू बुखारा- २००, मोसंबी- ८०, संत्री- ८०, ड्रॅगन फ्रूट - १५०, लाल द्राक्ष- ३००, अंजीर- १६० किलोने मिळत आहे. तीन फळांचे किवीचे पॅकेट १०० रुपयाला विकले जात आहे. खानदेशाच्या केळीचे भाव स्थिर आहेत. केळी ३० ते ४० रुपये डझन आहेत.

कसमादेत सफरचंद, केळी वगळता जवळपास सर्वच प्रमुख फळे उत्पादित केले जातात. घाऊक व्यापारी थेट शेतकऱ्यांशी संपर्क करून माल खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांनी हिवाळी टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. पेरू, सीताफळ, अंजीर, ॲपल बोर, पपईच्या लागवडीत वाढ होत आहे. इतर शेतमालापेक्षा फळशेतीतून उत्पादकांना नेहमीच दिलासा मिळतो.

विशेषतः: डाळिंबाने बळीराजाला नेहमीच साथ दिली आहे. शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या हस्त बहाराचे नियोजन केले आहे. फेब्रुवारीनंतर उत्पादन येईल. दुष्काळी परिस्थितीत डाळिंब व इतर फळबागा फुलवितांना शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.

"बाजारात सर्वच फळांची आवक आहे. सणासुदीचे दिवस असल्याने बऱ्यापैकी ग्राहक आहेत. पेरू, पपई, केळी, सफरचंद या फळांना चांगली मागणी आहे." - नदीम खान, फळविक्रेते, मालेगाव

Fruit trolleys at shops
Nashik News: जनावरांच्या चाऱ्यासाठी शोधाशोध; दुष्काळग्रस्त परिस्थितीने पशुधनपालक हवालदिल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.