Police Bharati : वर्षामागून वर्षे निघून चालली, संधी केव्हा?

Police Bharati 2022
Police Bharati 2022esakal
Updated on

पिंपळगावं बसवंत (जि. नाशिक) : मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील हजारो युवकांना पोलिस भरतीची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारने भरतीची जाहिरात काढल्याने उमेदवारांत उत्साहाचे वातावरण संचारले होते. मात्र, या पोलिस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने तरूणांमध्ये निराशेचे मळभ दाटले आहे.

तीन वर्षांनंतरचा आनंद औटघटकेचा ठरला असून आम्ही आणखी किती काळ प्रतीक्षा करायची असा प्रश्‍न तयारी करणाऱ्या युवकांनी उपस्थित केला आहे. वर्षामागून वर्षे निघून चालली असून भरतीतून बाद झाल्याची वाट सरकार पाहत आहे का? तरूणांच्या भावनांशी खेळणे थांबवावे अशी विनंती त्यांनी केली आहे. (frustration among youth who preparing for police recruitment nashik due to delay Nashik News)

राज्यासह जिल्ह्यातील हजारो युवक पोलिस भरतीची तयारी करीत आहेत. मैदानी चाचणी मारण्यासाठी त्यांच्याकडून निरंतर तयारी सुरू आहे. जाहीरात कधीही येईल या आशेने ते तयारीवर भर देत आलेले आहेत. पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहत असतानाच भरतीची जाहिरात आल्याने ते अतिशय मनापासून तयारीला लागले होते. मेगा पोलिस भरती होणार असल्याने काही झाले तरी यंदा मैदान मारायचे, असा चंगच अनेकांनी बांधला होता.

मात्र, प्रशासकीय कारण पुढे करून पोलिस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने या युवकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या तीन वर्षांत पोलिस भरती झालेली नाही. तरी पोलिस होण्यासाठी सर्वच स्तरातील उमेदवार उत्सुक आहेत. दीर्घ कालावधीनंतर एका संधीने चाहुल दिली. मैदानी चाचणी व लेखी अभ्यास करीत या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे जोश निर्माण झाला होता. काहीची वयोमर्यादा संपण्याच्या मार्गावर आहे अशा उमेदवारांमध्ये अधिक चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Police Bharati 2022
NMC Property Tax Recovery: घरपट्टी वसुलीसाठी आजपासून पुन्हा 'ढोल बजाव' मोहीम सुरू

तहानभूक विसरून ग्रामीण भागातील मुले दिवसरात्र पोलिस भरतीची तयारी करीत आहेत. आपण पोलिस होऊ असा आशावाद त्यांच्यात आहे. घरच्या भाकरीवर कुठपर्यत जगायचे असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. उमेदवारांच्या संयमाचा बांध फुटण्यापूर्वी पोलिस भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी युवकवर्गाने केली आहे.

"पोलिस भरतीच्या स्थगितीने हातातोंडाशी आलेली संधी हिरावली गेली आहे. गेल्या सहा वर्षांपासून नियमित तयारी सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता खर्चही परवडत नाही. तरीदेखील पोलिस होण्याची एक आशा निर्माण झाली होती. स्थगितीने तीदेखील हिरावली गेली आहे. शासनाने लवकरता लवकर भरती जाहीर करावी."- यश निसार, विद्यार्थी.

"लहानपणापासूनच पोलिस दलाचे आकर्षण आहे. पोलिस व्हायचे असे ठरवूनच मैदानी व लेखी परीक्षेची तयारी सुरू केली. आता तीन वर्षांनंतर पोलिस भरती होणार म्हणून एक नवी उमेद जागली होती. मात्र, स्थगिती देण्यात आल्याने पुन्हा भविष्याची चिंता निर्माण झाली आहे."

- रोशन बनकर, विद्यार्थी.

Police Bharati 2022
CM Eknath Shinde Group : कट्टर शिवसैनिक वसंत पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()