मनमाड (जि. नाशिक) : नागापूर परिसरातील इंडियन ऑइल कंपनीचे इंधन टँकर रस्त्यावर पार्किंग केले जात असल्याने यामुळे अपघात होऊन वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याचे नागापूरचे सरपंच राजेंद्र पवार यांनी कंपनीच्या निदर्शनास आणून दिले.
मात्र, सदर टँकर आमच्या कंट्रोलमध्ये येत नसल्याचे उत्तर देत कंपनीने मनमाड पोलिसांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचे काम केल्याची संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. (Fuel tanker parking on road Risk of accident at nagapur Nashik News)
इंडियन ऑइल कंपनीच्या शाखा प्रबंधकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या कंपनीत इंधन भरण्यासाठी येणारे टँकर गेटबाहेर उभे न राहता सर्रासपणे मनमाड- नांदगाव महामार्गावर उभे केले जात आहे. मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे नागापूर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. इतकेच नव्हे तर आपल्या कंपनीतून इंधन भरलेले वाहन सुद्धा रस्त्यावर उभे केले जात असल्यामुळे भीषण अपघात होण्याची दाट श्यक्यता नाकरता येत नाही. कंपनीच्या वतीने इंधन टँकरधारकांना सक्त ताकीद देऊन आपापली वाहने रस्त्यावर उभी न करता कंपनीच्या पार्किंग झोनमध्येच उभी करण्याबाबत आदेश द्यावे.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
भरलेले टँकर अथवा उभ्या असलेल्या टँकरचा अपघात झाल्यास त्यास कंपनी जबाबदार असेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. अपघातात झालेल्या हानीचा खर्चदेखील कंपनीकडून वसूल करण्यात येईल, असा इशारा कंपनी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात दिला आहे.
मात्र, परिस्थितीचा कुठलाही विचार न करता कंपनी अधिकाऱ्यांनी महामार्गावर उभ्या राहणाऱ्या टँकरची जबाबदारी मनमाड पोलिसांची असल्याचे उत्तर दिले आहे. कंपनी अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु, याबाबत संतापदेखील व्यक्त केला जात आहे.
"इंडियन ऑइल कंपनीसमोर रस्त्यावर टँकर उभे करू नये. त्यांना पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, याबाबत कंपनीला पत्र दिले आहे. सोमवारपर्यंत पार्किंगची सोय करण्याचे कंपनीने म्हटले आहे. रस्त्यावर उभ्या करणाऱ्या वाहनचालकांना दंड केला जात आहे. चालकांनी टँकर रस्त्यावर उभे न करता पार्किंगमध्ये उभे करावे."- प्रल्हाद गीते, प्रभारी पोलिस निरीक्षक, मनमाड
"रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या इंधन टँकरबाबत पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, ते टँकर कंपनीचे आहे. त्यांना पत्र दिले असून, टँकर चालकांना समज देतील, असे पोलिसांनी कळविले आहे. तर इंधन ऑइल कंपनीचे अधिकारी हे काम पोलिसांचे असल्याचे सांगत आहे. टँकर पुन्हा उभे राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." - राजेंद्र पवार, सरपंच, नागापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.