Fuel transportation Strike : इंधन वाहतूक होणार ठप्प; वाहतूकदारांकडून अचानक संप!

Tanker of Indian Oil Company standing due to ongoing strike
Tanker of Indian Oil Company standing due to ongoing strikeesakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला इंधन पुरवठा करणाऱ्या पानेवाडी (ता. नांदगाव) येथील इंधन प्रकल्पातील इंडियन ऑइल कंपनीच्या निविदा प्रक्रियेतील मनमानी कारभाराच्या निषेधार्थ कंपनीच्या इंधन वाहतूकदारांनी अचानक संपाचे हत्यार उपसल्याने प्रकल्पातून होणारी इंधन वाहतूक ठप्प होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (Fuel transportation will stopped Sudden strike by transporters nashik news)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Tanker of Indian Oil Company standing due to ongoing strike
NAFED Onion Purchase : अधिवेशन संपताच नाफेडची खरेदी थांबली! शेतकरी संतप्त

पानेवाडी येथील इंधन प्रकल्पातील इंडियन ऑइल कंपनी प्रशासन मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याने त्याचा फटका वाहतूकदारांना बसत आहे. खरेदी केलेले टँकर टेंडर प्रक्रियेत नाकारण्यात आल्याने वाहतूकदारांना मोठा फटका बसत आहे.

या घटनेच्या निषेधार्थ वाहतूकदारांनी संप पुकारल्याने कंपनी परिसरात इंधन वाहतूक करणारे टँकर उभे करून ठेवण्यात आले आहे. कंपनी प्रशासन वाहतूकदारांच्या मागण्या जोपर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार वाहतूकदाराने घेतल्याने तिढा निर्माण झाला आहे.

Tanker of Indian Oil Company standing due to ongoing strike
Market Committee Election : उमेदवारीसाठी आर्थिक सक्षमता हवीच! बनकर-कदम गटाकडे इच्छुकांची लॉबिंग सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.