Nashik News : किरकोळ कारणावरून चालकाला मारहाण; इंधन वाहतूकदारांचे वाहतूक बंद आंदोलन

Fuel transporters and drivers stage protest by stopping fuel transport nashik news
Fuel transporters and drivers stage protest by stopping fuel transport nashik newsesakal
Updated on

Nashik News : नागापूर शिवारात काल (ता. २५) रात्री टँकर रस्त्यावर उभे करण्याच्या वादातून टँकरच्या काचा फोडत चालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज सकापासून तीन तेल कंपन्या व गॅस बॉटलींग प्रकल्पातील इंधन वाहतूकदार व चालकांनी इंधन वाहतूक बंद करत आंदोलन पुकारले.

यामुळे आंदोलनामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्याचा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही.

तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या निर्धारामुळे तिढा वाढला आहे. (Fuel transporters and drivers stage protest by stopping fuel transport nashik news)

नागापूर, पानेवाडी शिवारात इंधन कंपन्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन वाहतूक करणारे टँकर उभे असतात. काल (ता. २५) विविध मागण्यांसाठी इंधन वाहतूकदार चालकांचा सुरू असलेला संप मिटल्यामुळे इंधन टँकर वाहतूक सुरळीत झाली होती. नागापूर, पानेवाडी इंधन प्रकल्पातून इंधन भरून निघालेले टँकर रस्त्याच्या दुतर्फा उभे केले जातात.

याबाबत अनेकदा कंपनीला निवेदनेही देण्यात आले होते. मात्र टँकर रस्त्यावर उभे केले जात होते. नागापूर शिवारात काल (ता. २५) रात्री टँकर रस्त्यावर उभे करण्याच्या वादातून कंपनीच्या समोर वाहतूकदारांचे नेते नाना पाटील यांच्या उभ्या असलेल्या इंधन टँकरवर काही अज्ञात तरुणांनी चाल करत टँकरच्या काचा फोडल्या आणि चालकास मारहाण केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fuel transporters and drivers stage protest by stopping fuel transport nashik news
Shabari Gharkul Yojna News : 25 हजार घरकुलांचे वाटप व्हायला हवे : पालकमंत्री दादा भुसे
इंधन वाहतूक बंद करत आंदोलन
इंधन वाहतूक बंद करत आंदोलनesakal

जमाव वाढू लागल्याने पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवला. मात्र आज सकाळी या घटनेच्या निषेधार्थ इंडीयन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन इंधन कंपन्या आणि इंडीयन गॅस बॉटलींग प्रकल्पातील इंधन वाहतुकदार आणि चालकांनी वाहतूक बंद करत आंदोलन पुकारले आहे.

त्यामुळे चारही कंपन्यांच्या बाहेर इंधन टँकर वाहतुकदार, चालकांची मोठी गर्दी जमा झाली होती. वाहतूकदारांच्या आंदोलनामुळे या कंपन्यांतून उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्याचा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. एकही टँकर इंधन भरून बाहेर पडले नाही. जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार वाहतूकदारांनी केल्यामुळे तिढा वाढला आहे.

Fuel transporters and drivers stage protest by stopping fuel transport nashik news
Nashik News : जिल्ह्यात 250 शिक्षकांचे निवृत्तिवेतन थकले; पालकमंत्र्यांसमोर केंद्रप्रमुख संघाची कैफियत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.