Nashik Crime News : आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅरेज काम करणार्याच्या खून प्रकरणी गेल्या आठ महिन्यापासून फरार असलेल्या मुख्य संशयितास गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली.
संशयिताचा सिनेस्टाईल पाठलाग करीत अटक केली असून, त्याच्याकडून एक तलवारही जप्त करण्यात आली आहे. (Fugitive murder suspect arrested by police nashik crime news)
विजय राजेंद्र पाटील (२४, रा. पंचवटी अमरधाम, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. बुधवारी (ता.३) रात्री अकराच्या सुमारास जनार्दन स्वामी मठाकडून तपोवन रोड येणार्या रोडवर संशयित विजय पाटील हा वाहनांना अडवून शिवीगाळ करीत असल्याची खबर शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे विशाल काठे यांना मिळाली होती.
युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझीम पठाण, विशाल काठे, प्रशांत मरकड यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, संशयित विजय पाटील हा त्यांना पाहून पळू लागला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करीत शिताफीने अटक केली.
त्याच्याकडून एक तलवारही जप्त केली. गेल्या आठ महिन्यापासून आडगावमधील टायर पंचर काढणार्याचा खूनाच्या गुन्ह्यात फरार होता. त्यास तपासासाठी आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या गुन्ह्यात होता फरार
गेल्या ३० एप्रिल २०२३ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास टाकळी लिंकरोडवरील टायर पंचर दुकानात काम करणार्या नुरएन सरफुद्दीन अन्सारी (२९, रा. समता नगर, टाकळीगाव) याचा तिघा संशयितांनी धारदार हत्याराने वार करून खून केला होता.
याप्रकरणी आडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल असून, संशयित यश कैलास पवार (गोंधळी), प्रसाद रामदास पवार या दोघांना अटक केली आहे. तर, मुख्य संशयित विजय पाटील तेव्हापासून फरार होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.