Sant Nivruttinath Maharaj Palakhi : संत निवृत्तिनाथ पालखीसाठी 30 लाखांचा निधी

Sant Nivruttinath Maharaj temple
Sant Nivruttinath Maharaj templeesakal
Updated on

Sant Nivruttinath Palakhi : श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ही माहिती दिली. (Fund of 30 lakhs for Sant Nivruttinath Palakhi nashik news)

पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाण्याच्या टँकरसह मोबाईल टॉयलेही उपलब्ध होणार आहेत. पालखी सोहळ्यासाठी प्रत्येकी दहा सीटचे १२ मोबाईल टॉयलेट पंढरपूरपर्यंत पुरवण्यात येणार आहेत.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर येथून २ जूनला संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात ४२ दिंड्यांसह हजारो वारकरी सहभागी होणार आहेत.

पालखी सोहळ्यातील वारकरी सुमारे २५ दिवस पायी प्रवास करून आषाढ दशमीला पंढरपूरात पोचणार आहेत. पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेकडून दर वर्षी आरोग्य पथक व पाण्याचा टँकर पुरवला जातो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sant Nivruttinath Maharaj temple
NMC Water Shortage : ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा भार शहरावर पडण्याची शक्यता!

त्यासाठी जिल्हा परिषद सेस निधीतून चार लाखांची तरतूद केली जाते.एवढ्या मोठ्या दिंडी सोहळ्यात ही सुविधा अपुरी पडत आहे. यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निर्मलवारीसाठी फिरते टॉयलेट व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुविधा पुरवण्याची मागणी केली होती.

या मागणीला प्रतिसाद देत पालखी सोहळ्यासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पाच टँकर पंढरपूरपर्यंत पुरवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय १२ फिरते टॉयलेटही पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे संत निवृत्तिनाथ पालखी सोहळा आता निर्मलवारी होणार आहे. यासाठी यंदा प्रथमच ३० लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात आला आहे.

Sant Nivruttinath Maharaj temple
NMC Drainage Cleaning : बेसमेंटला पाणी साठून दुर्घटना घडल्यास कारवाई!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.