सटाणा : बागलाण तालुक्यातील रस्त्यांसह इतर विकासकामांसाठी अर्थसंकल्पात ३११ कोटी रुपयांना राज्य सरकारने मंजुरी दिली.
आमदार दिलीप बोरसे यांनी ही माहिती शुक्रवारी (ता. ८) दिली. (Fund of 311 crores approved for plantation MLA Dilip Borse Nashik News)
श्री. बोरसे म्हणाले, की राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यात विविध विकासकामांसाठी अधिक निधी मिळवण्यासाठी नियोजन केले होते. त्या प्रयत्नांना यश आले आहे.
तालुक्यातील दळणवळण सुलभ होऊन विकासाचा वेग वाढण्यासाठी रस्ते विकासासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार वेगवेगळे रस्ते व पुलांच्या कामांबाबत आराखडा तयार करून संबंधित प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला होते.
त्यानुसार आदिवासी विकास विभागाकडून रस्ते विकासासाठी १७५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. शिवाय रस्ते व पुलांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १०३ कोटी रुपये निधीस मंजुरी दिली आहे.
मोसम नदीवरील सोमपूर ते तांदूळवाडी रस्त्यावरील पुलासाठी ९ कोटी, जायखेडा ते वाडी पिसोळ रस्त्यावरील मोसम नदीवर पूल बांधकामासाठी १० कोटी, राजपूरपांडे गावाजवळ मोसम नदीवर पूल बांधकामासाठी १० कोटी, सटाणा शहरातील चौगाव रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ८ कोटी, नामपूर गावातून जाणाऱ्या रस्त्यासाठी १ कोटी, नामपूर ते रातीर रस्त्यासाठी दीड कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतमालाची ने-आण करणे वेगवान होईल.
आश्रमशाळा होणार आदर्श
बागलाण तालुका आदिवासी बहोल असून दुर्गम डोंगर-दऱ्यांतील वाड्या-वत्यांवरील आदिवासी मुले-मुली शिक्षणासाठी आश्रमशाळांमध्ये वास्तव्य करतात.
आश्रमशाळांचा दर्जा सुधारल्याने आदिवासींच्या शैक्षणिक प्रगतीस मोलाचा हातभार लागू शकतो. त्यामुळे तालुक्यातील आश्रमशाळांमधील सेवा-सुविधा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
तालुक्यातील वीरगावपाडे, भिलवाड, ततानी, हरणबारी व वाघंबा या आश्रमशाळांना आदर्श शाळांमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने स्वतंत्र ३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.