विकास गिते ः सकाळ वृत्तसेवा
Nashik News : सिन्नर विधानसभा मतदारसंघातील रोहित्रांसाठी चाळीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून टाकेद गटातील गावांसाठी नवीन अकरा तर सिन्नर तालुक्यातील गावांसाठी नव्याने २२ रोहित्र मंजूर करण्यात आले आहेत. (fund of 40 lakhs has been approved for Rohitras in Sinnar Assembly Constituency nashik news)
जळालेले रोहित्र जिल्हा स्तरावरून बदलून मिळत असल्याने त्यासाठी अनेकदा आठवडा लागायचा. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून सिन्नर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना आता तालुकास्तरावरच जळालेले रोहित्र तत्काळ बदलून मिळणार आहे.
जळालेले रोहित्र शहरी भागात तात्काळ बदलून मिळते, मात्र ग्रामीण भागात अनेकदा आठवडाभरातही ते बदलून मिळत नाही. जळालेले रोहित्र बदलून आणण्यासाठी अनेकदा शेतकऱ्यांनाच नाशिकला जावे लागते. तिथेही रोहित्र शिल्लक नसल्यास शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
यावर उपाय म्हणून शासनाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत तालुकास्तरावर जळालेले रोहित्र बदलून देण्याचे ठरवले. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील व टाकेद गटातील गावांना तालुकास्तरावर रोहित्र बदलून मिळावे यासाठी सुमारे ३४ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सिन्नर तालुक्यासाठी २१ लाख ७९ हजार रूपयांच्या निधीतून २२ नवीन रोहित्र व मतदारसंघात असलेल्या इगतपुरी तालुक्यातील टाकेद गटातील गावांसाठी १८ लाखांच्या निधीतून ११ नवीन रोहित्र मंजूर करण्यात आले आहेत. सिन्नर तालुका उपविभागाला येत्या २ ते ४ दिवसांत हे रोहित्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुकास्तरावर आता रोहित्र बदलून मिळणार असल्याने गावठाण हद्दीत व शिवारातील जळालेले रोहित्र तात्काळ बदलून मिळतील. त्यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
जळालेले रोहित्र बदलण्यासाठी नाशिक येथे कळवावे लागते, त्यानंतर जसे उपलब्ध होईल, त्याक्रमाने ते बदलून दिले जाते. आता तालुक्याच्या उपविभागालाच ते उपलब्ध होणार असल्याने लवकर बदलून मिळतील यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचून मनस्तापही टळणार आहे असे आमदार कोकाटे यांनी म्हटले आहे.
"नाशिक ऐवजी सिन्नरला जळालेले रोहित्र बदलून मिळण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी निधी मंजूर केल्याने ग्रामीण भागातील अडचणी दूर होणार आहेत." - नानासाहेब खुळे, अध्यक्ष, तेरा गावे प्रादेशिक पाणीयोजना, वडांगळी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.