Nashik Crime : ISIS ला नाशिकमधून फंडिंग! संशयित ATS च्या ताब्यात; 7 दिवसांची पोलिस कोठडी

'इसिस’ (ISIS) या क्रुर दहशतवादी संघटनेला नाशिकमध्ये आर्थिक पतपुरवठा (फंडिंग) करणाऱ्या संशयिताला मंगळवारी (ता. २३) रात्री अटक करण्यात आली आहे.
Funding ISIS from Nashik Suspect in custody of ATS 7 days police custody terrorism
Funding ISIS from Nashik Suspect in custody of ATS 7 days police custody terrorism esakal
Updated on

नाशिक : 'इसिस’ (ISIS) या क्रुर दहशतवादी संघटनेला नाशिकमध्ये आर्थिक पतपुरवठा (फंडिंग) करणाऱ्या संशयिताला मंगळवारी (ता. २३) रात्री अटक करण्यात आली आहे.

विशेष न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या संशयिताला येत्या ३१ तारखेपर्यंत ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, इसिस या दहशतवादी संघटनेचे लोण नाशिकपर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली असून, यात सामील असलेल्यांचा एटीएस (दहशतवादविरोधी पथक) शोध घेत आहे. तर काही पथके परराज्यात तपासाकामी गेले आहेत. (Funding ISIS from Nashik Suspect in custody of ATS 7 days police custody terrorism crime news)

हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०, रा. एमराल्ड रेसिडेन्सी , बाजीराव नगर, तिडके कॉलनी, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या हुजेफ याची नाशिक आणि मुंबई एटीएसच्या विशेष पथकांकडून गेल्या तीन दिवसांपासून चौकशी केली जात होती.

अखेर मंगळवारी (ता. २३) रात्री पथकाने हुजेफ यास अटक केली. बुधवारी (ता. २४) हुजेफ यास विशेष न्यायालयात हजर केले असता, यावेळी सरकार पक्षातर्फे विशेष जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी तर, बचाव पक्षातर्फे ॲड फजल सय्यद यांनी युक्तिवाद केला.

दोन्ही पक्षाचे युक्तीवाद झाल्यानंतर, न्या. श्रीमती मृदुला भाटिया यांनी संशयित हुजेफ यास येत्या ३१ तारखेपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयित उच्चशिक्षित

संशयित हुजेफ हा इंजिनिअर असून, त्यांच्या स्वत:च्या ३ ते ४ कंपन्या आहेत. तसेच काही कंपन्यांमध्ये तो भागीदारही असून ॲग्रो आणि एक्सपोर्टशी संबंधित त्याचा व्यवसाय आहे. तसेच, त्याने गेल्या काही वर्षात परदेशात दौरे केले आहेत.

यात युएई, शारजाह, दुबई, कोलंबो याठिकाणांचा समावेश आहे. एटीएसने अटक केल्यानंतर त्याच्या घरझडतीतून ७ मोबाईल, ३ सीमकार्ड, एक लॅपटॉप, एक पेनड्राईव्ह असे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे.

संशयित हुजेफ याची पत्नीही उच्चशिक्षित असल्याचे तपासातून समोर आलेले आहे. कुटूंबियांसह तो तिडके कॉलनीतील एम्पायर्स अपार्टमेंटमध्ये राहतो.

Funding ISIS from Nashik Suspect in custody of ATS 7 days police custody terrorism
Coimbatore Blast Case: आणखी दोन आरोपींवर आरोपपत्र दाखल; एनआयएची मोठी कारवाई

पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात

संशयित हुजेफ याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी महिला राबिया उर्फ उम्म ओसामा हिच्याशी ओळख झाली. तिच्याच सांगण्यावरून हुजेफ याने मोठ्याप्रमाणात ऑनलाईन आर्थिक व्यवहार केले आहेत.

त्याच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय या बँकांच्या खात्यातून हे व्यवहार झाले आहेत. तसेच, देशातील महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा व बिहार या राज्यातील बँकांतूनही आर्थिक व्यवहार झाले आहेत.

यातील राबिया नामक महिलाचे ऑनलाईन लोकेशन हे सीरिया दाखवित असल्याने इसिस या क्रुर दहशतवादी संघटनेशी हुजेफ याचे संबंध असल्याचा दाट संशय व्यक्त केला गेला आहे.

२०१९चे धर्मयुद्ध

संशयित हुजेफ याच्याकडे सापडलेल्या काही संशयास्पद दस्तऐवजावरून सिरियात २०१९ मध्ये झालेल्या बॅटल ऑफ बाबूस्‌ या धर्मयुद्धामध्ये मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत राबिया नामक महिलेच्या सांगण्यावरून केल्याचे तपासात समोर येत आहे.

राबिया नामक महिलेच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्कात होता. त्यांचे कम्युनिकेशन एटीएसच्या हाती लागले आहे.

Funding ISIS from Nashik Suspect in custody of ATS 7 days police custody terrorism
Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरण; विठ्ठल शेलार व रामदास मारणेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

एटीएस सतर्क; पथके रवाना

दहशतवादविरोधी पथक (एटीएस) सतर्क झालेले असून, काही पथके महाराष्ट्रासह बिहार, तेलंगणा व कर्नाटकात तपासाकामी रवाना करण्यात आलेली आहे.

संशयित हुजेफ याचा इसिससह इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशीही संबंध असण्याची शक्यता आहे. दोन दिवसांवर आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरही घातपाताची शक्यता लक्षात घेता एटीएसकडून सखोल तपास केला जात आहे.

"संशयित हुजेफ याचे इसिसशी असलेला संबंध, किती प्रमाणात फंडिंग केले यासह तो कधीपासून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आहे याचा शोध एटीएसकडून घेतला जात आहे. त्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीची आवश्यकता होती. चौकशीतून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागणार आहेत. काही बाबी तपासकामी गोपनीय असल्याने त्या योग्य वेळी उघड केल्या जातील."- ॲड. अजय मिसर, विशेष जिल्हा सरकारी वकील, नाशिक.

तपासातून...

- तीन दिवसांच्या चौकशीनंतर अटक

- संशयित पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात

- सोशल मीडियावरील चॅटिंग, फंडिंगचे पुरावे सादर

- ७ मोबाईल, ३ सीमकार्ड, एक लॅपटॉप, एक पेनड्राईव्ह, पासपोर्ट, महत्त्वाचा दस्तऐवज जप्त

- मोठ्याप्रमाणात परदेश दौरे

- फंडिंगसाठी राष्ट्रीयकृत बँकांचा बिनधास्त वापर

- संशयित उच्चशिक्षित व सुशिक्षित कुटूंबातील

Funding ISIS from Nashik Suspect in custody of ATS 7 days police custody terrorism
Sudhakar Badgujar Fraud Case: सुधाकर बडगुजर यांना दिलासा; अपहार प्रकरणात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.