SAKAL EXCLUSIVE : तालुका स्तरावर निधी खूपच तोकडा असल्याने संयोजनासाठी कसरत

Nandgaon: Group Education Officer Pramod Chinchole and teachers who have contracted to dance with the children at the conclusion of the taluk level president's trophy competition here
Nandgaon: Group Education Officer Pramod Chinchole and teachers who have contracted to dance with the children at the conclusion of the taluk level president's trophy competition hereesakal
Updated on

मालेगाव शहर : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रेरणा देण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे अध्यक्ष करंडक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा भरविली जाते. पण त्यासाठी संयोजनाचा खर्च पाहता निधी मात्र तोकडा दिला जातो.

त्यामुळे वाढलेल्या महागाईत उपक्रमाच्या संयोजनाची व्याप्ती पाहता खर्च खूप येत असल्याचे शिक्षक सांगतात. परिणामी, संयोजन करताना गावस्तरावरील, वस्ती वाड्यावरील शाळांतील मुलांचा प्रथम टप्पा केंद्र पातळीवर घेतला जातो. (Funds are very limited at taluka level exercise coordination Need to increase funds for President Trophy Nashik news)

Nandgaon: Group Education Officer Pramod Chinchole and teachers who have contracted to dance with the children at the conclusion of the taluk level president's trophy competition here
Nashik News | सत्यजित तांबेंना भेटण्याचा निरोप आला, आम्ही भेटणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अध्यक्ष करंडक ही संकल्पना जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष ॲड. अनिल आहेर यांची होती. या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या कलागुण व कौशल्यांना वाव दिला. त्यानंतर बीटस्तरावर एकदिवसीय स्पर्धा घेऊन तालुकास्तरावर क्रीडा, खेळ, मैदानी स्पर्धा एक दिवस, वक्तृत्व, चित्रकला, गीतगायन, नृत्य समूहगीत समूहनृत्य हे प्रकार दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात येतात. यंदापासून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनात स्पेलिंग बी व बुद्धीबळ या दोन प्रकारांचा समावेश अतिशय महत्त्वपूर्ण ठरला आहे.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

Nandgaon: Group Education Officer Pramod Chinchole and teachers who have contracted to dance with the children at the conclusion of the taluk level president's trophy competition here
Turkey Earthquake News : तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप! अनेक घरं कोसळली

ग्रामीण भागातील खेडोपाड्यातील जिल्हा परिषद शाळांचे चिमुकले आपल्या गुरुजींच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट कलाविष्काराचे दर्शन पालक, शिक्षक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांना घडवितात. त्यासाठी विविध पेहराव, फॅशनेबल साहित्य, विविध गीतांच्या कॅसेटस्, सीडी, दूरचित्रवाणी संच, संगणकाचा वापर सरावासाठी करताना ते उपलब्ध करावे लागते.

त्यासाठीचे पोशाख महागड्या भाड्याने शहरातून शिक्षक मंडळी पदरमोड करून आणतात. संयोजनासाठी मंडपाचा दोन दिवसांचा किमान खर्च आठ ते दहा हजार रुपये, हॉल घेतल्यानंतर पंधरा ते वीस हजार रुपये, डिजिटल साउंड सिस्टीमचा खर्च, प्रथमोपचार साहित्य, बक्षीसरूपात सहभाग प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हे, ढाल, शैक्षणिक साहित्य हा खर्च पाहता जिल्हा परिषदेच्या अल्प अनुदानात शक्य होत नसल्याने पालक व शिक्षकांनाच हे करावे लागते.

सांस्कृतिक आवड निवड असलेले शिक्षण विभागातील अधिकारी आपल्या कौशल्याने प्रायोजक शोधतात, काही स्वखर्चाने उत्तम कार्यक्रम घडवतात. जिल्हा परिषदेने विद्यार्थीदर्शी अशा चांगल्या प्रेरक उपक्रमासाठी निधी वाढविण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून तालुकास्तरावर किमान लाख रुपये निधी देण्याची गरज असल्याचे पालक व शिक्षकांनी सांगितले.

Nandgaon: Group Education Officer Pramod Chinchole and teachers who have contracted to dance with the children at the conclusion of the taluk level president's trophy competition here
Nashik News : सावकाराच्या जाचाला कंटाळून भावांनी घेतले विष; एकाचा मृत्यू, दुसऱ्यावर उपचार सुरू

"जिल्हा परिषद अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यातून भविष्यातील खेळाडू, कलावंत घडणार आहेत. त्यामुळे तालुकास्तरीय स्पर्धांसाठी निधी वाढविण्याची गरज आहे. यामुळे अजून चांगल्या स्पर्धा घेण्यास मदत होईल."

- प्रमोद चिंचोले, गटशिक्षणाधिकारी नांदगाव

"वर्षभरात जिल्हा परिषदेतर्फे एकमेव प्रेरक उपक्रम राबविण्यात येतो. मात्र या स्पर्धेची व्याप्ती लक्षात घेता आर्थिक तरतूद कमी पडते. दोन दिवसीय तालुका स्तरावरील नियोजनासाठी निधी वाढवण्याची गरज आहे."

- वाल्मीक घरटे, जिल्हा कार्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक भारती.

"सांस्कृतिक स्पर्धा व खेळाबाबत आपला पाल्य चमकदार कामगिरी करेल म्हणून ग्रामीण भागातील पालकही हौशी असतात.अध्यक्ष चषक स्पर्धेला पुरेसा वेळ, आर्थिक नियोजन व व्यवस्थापन व्यापक करावे."

- भास्कर भामरे, मुख्याध्यापक, पांढरीपाडा

Nandgaon: Group Education Officer Pramod Chinchole and teachers who have contracted to dance with the children at the conclusion of the taluk level president's trophy competition here
Jalgaon News : जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संपावर जाणार; जिल्हा बैठकीत निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.