Nashik News: सप्तशृंगी गडावरील फनिक्युलर रोप-वे सेवा सुरळीत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

भाविकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुयोग गुरुबक्साणी फनिक्युलर रोप वे ट्रॉली कंपनी व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
Funicular rope way service at Saptshringi Fort
Funicular rope way service at Saptshringi Fortesakal
Updated on

वणी : सप्तशृंगी गडावर फनिक्युलर रोप वे ट्रॉली सेवा सुरळीत सुरु असून भाविकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुयोग गुरुबक्साणी फनिक्युलर रोप वे ट्रॉली कंपनी व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. (Funicular rope way service at Saptshringi Fort smooth appeal not to believe rumours Nashik News)

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर आदिमाया सप्तश्रृंगीच्या वृद्ध, अपंग, आजारी, गरोदर महिला,

लहान मुले अशा भाविक भक्तांना आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी मंदीराच्या सुमारे पाचशे पन्नास पायऱ्याचढणे त्रासदायक ठरत असल्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी युक्रेन नंतर देशानंतर देशातील पहिला फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या प्रकल्पाचे १५ ऑगस्ट २००९ रोजी भूमीपूजन करुन कामाचा शुभारंभ केला होता.

सदरचा प्रकल्पाचे कामाची ९ वर्षांनतर विविध आवश्यक परवानग्यांसह पुर्ण झाल्यानंतर, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फनिक्युलर रोप वे ट्रॉलीचे लोकार्पन करण्यात आले होते.

Funicular rope way service at Saptshringi Fort
Nashik Police: खबरदार! गोंगाट कराल तर...; थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची तंबी

तद्पासून फनिक्युलर रोप वेची सेवा सुरक्षित व सुरळीत चालू आहे. दरम्यान सोमवारी, ता. २५ रोजी रोप वे सुरु असतांना सकाळी ९ वाजेच्या दरम्यान ट्रॉलीच्या सेवेत तांत्रिक समस्या उद्भवल्याने रोप वे प्रशासनाने खबरदारी घेवून देखभाल व दुरुस्तीसाठी रोप वे सेवा ही दुपारी ४ वाजे पर्यंत बंद ठेवली होती.

त्यानंतर मात्र रोप वे सेवा ही पूर्ववत व सुरळीत सुरु असल्याची माहीती प्रकल्पाचे विद्युत अभियंता अनिल सोनवणे यांनी दिली आहे.

मात्र काही सोशल मिडीयातून रोप वे सेवा बंद असल्याचे व पुढील दोन दिवस बंद असणार असल्याची चुकीची माहिती व अफवा प्रसारीत होत आहे.

मात्र रोप वेची सेवा नियमीत व सुरळीत सुरु असून भाविकांनी अशा अफवेवर विश्वास न ठेवता गडावर श्री भगवतीच्या दर्शनासाठी यावे असे आवाहन रोप वे प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक राजीव लुंबा यांनी केले आहे.

Funicular rope way service at Saptshringi Fort
Nashik Police: नाशिक पोलीस ‘सोशल मीडिया’वर आणखी एक पाऊल पुढे! पहिल्याच दिवशी 90 सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.