Nashik Traffic Police: शहर वाहतूक नियोजनाचा खेळखंडोबा! 46 किलोमीटर कार्यक्षेत्राचा भार 15 वाहतूक पोलिसांवर

New encroachment by street vendors and hawkers on Satana Street in the city.
New encroachment by street vendors and hawkers on Satana Street in the city.esakal
Updated on

मालेगाव : शहराला हद्दवाढीनंतर महानगराचे स्वरूप आले आहे. दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असताना नगरविकास आराखड्याची अंमलबजावणी दुरापास्त झाली आहे. यातच शहरात बहुसंख्य प्रमुख रस्त्यांची कामे सुरु आहेत.

रस्ता रुंदीकरण होताच व्यावसायिकांकडून त्यावर अतिक्रमण होत आहे. याकडे होणारे दुर्लक्ष, पर्यायी रस्त्यांचा अभाव, मनपाचे ४६ किलोमीटरचे कार्यक्षेत्र, शहरातील ५७० किलोमीटरचे रस्ते, चौकातील शाळा- महाविद्यालये व मद्य विक्रीच्या दुकानांवर होणारी गर्दी, नियोजनाचा अभाव यामुळे शहरात ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी अडचणीची ठरत आहे.

मोसम पूल चौकात झालेल्या अपघातात एकाचा बळी गेल्यानंतर वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आला. मोठ्या शहराचा वाहतूक नियोजनाचा भार अवघे १५ पोलिस कर्मचारी सांभाळत आहे. (game of city traffic planning 15 traffic policemen responsible for 46 km operational area nashik)

शहरातील सर्व प्रमुख रस्ते व चौकात मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाहतूक कोंडी असते. वाहतूक कोंडीतून वाट काढताना प्रवाशांना व वाहनचालकांना नाकीनऊ येते. यातच शहरात सर्व दुचाकी, चारचाकी वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविले जात आहे.

मोबाईलवर बोलत अनेक जण सर्रास वाहने चालवतात. तोकड्या मनुष्यबळामुळे पोलिसांनाही कठोर कारवाई शक्य होत नाही. शहराच्या वाहतूक पोलिस शाखेच्या प्रश्नांबाबत शहरवासीय व पोलिस प्रशासनही गंभीर नाही.

सण, उत्सव, मिरवणुका, सभा, संमेलन अशा प्रसंगात तर वाहतूक पोलिसांची अक्षरश: धावपळ उडते. पेट्रोलिंग करत व गस्त घालत वाहतूक नियोजन करताना त्यांची त्रेधातिरपीट उडते.

यातच दिवसा अवजड वाहनांना शहरात बंदी नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. शहरवासीयांना रोजच वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशातच महानगरपालिका व पोलिस प्रशासनात समन्वयाचा अभाव आहे.

पार्किंग व्यवस्थेचा अभाव

शहरात वाहतूक समिती देखील गठित नाही. कुठेही पार्किंग झोन नाही. ट्रक टर्मिनस नाहीत. जागा मिळेल तेथे रिक्षा थांबे आहेत. भर रस्त्यात पार्किंग करणे हा शहरवासियांचा जणू काही हक्क झाला आहे.

शहरातील ८० टक्के व्यापारी संकुलात पार्किंगची सोय नाही. या सर्व समस्यांशी मनपा प्रशासनाला काही देणे-घेणे नाही. यात दिवसेंदिवस भर पडत आहे. शुक्रवार, सोमवारी भर रस्त्यात भरणारा आठवडे बाजारही सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरत आहे.

वाहतूक कोंडीच्या एका प्रश्‍नामुळे असंख्य समस्यांना तोंड फुटले आहे. मनपा प्रशासन विकास कामे करताना वाहतूक कोंडीचे नियोजन करत नाही. या समस्यांवर प्रथमदर्शनी मात करण्यासाठी शहर वाहतूक शाखेला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे.

New encroachment by street vendors and hawkers on Satana Street in the city.
Mumbai Agra Highway: मुंबई महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; अपघातप्रवण क्षेत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे

मोसम पूल चौक, मोतीबाग नाका, सटाणा नाका, रावळगाव नाका, सोमवार बाजार, एकात्मता चौक, बाजार समिती प्रवेशद्वार, भाजी मंडई, रामसेतू पूल, नवीन बसस्थानक, पिवळा पंप, दरेगाव चौफुली, चाळीसगाव फाटा, आझादनगर चौक, गूळबाजार, शनी मंदिर, मनमाड चौफुली, निसर्ग चौक, सुलेमानी चौक, गांधी मार्केट, अहिंसा सर्कल, खोका नाका, तांबा काटा, महात्मा फुले भाजी व फळ मार्केट, स्टेट बँक चौक, रॉयल हब व्यापारी संकुल याशिवाय शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयासमोर वाहतूक कोंडी होते.

शहर वाहतूक शाखेची स्थिती

शहर वाहतूक शाखेला आवश्‍यक कर्मचारी : ५६

वाहतूक शाखेत असलेले कर्मचारी : १५

यातील नियंत्रण कक्षात नियुक्ती : २

प्रसूती रजा : १

आजारपणाची रजा : १

साप्ताहिक सुटी : १

------------------------

प्रत्यक्षात कार्यरत कर्मचारी : १०,

१ सहाय्यक निरीक्षक

-----------------------------

छात्र सैनिकांची मदत घ्यावी

"शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यातच वाहतूक नियमांचे पालन न करणे असा शिरस्ता झाला आहे. सण, उत्सव काळात छात्र सैनिक पोलिसांना मदत करतात. आपण माजी छात्र सैनिकांची संघटन केले आहे. पोलिसांनी संमती दर्शविल्यास छात्र सैनिक पोलिसांना मदत करू शकतील. त्या बरोबरच विविध शाळा, महाविद्यालयातील छात्र सैनिक व आरएसपीचे विद्यार्थीही पोलिसांना मदतीसाठी उपलब्ध होऊ शकतात."

-प्रा. अशोक सोनवणे, निवृत्त छात्र सेना अधिकार

New encroachment by street vendors and hawkers on Satana Street in the city.
Nashik News: सिन्नर तालुक्यातील 43 रस्त्यांचे भाग्य उजाळणार; 131 कोटींचा निधी मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.