मोबाईल गेमचं वेड इतकं भयानक असतं की, गेम खेळणारे अगदी खाणं-पिणंसुद्धा विसरून जातात. सर्वसामान्यांसाठी गेम म्हणजे निव्वळ करमणूक किंवा विरंगुळा असतो, पण कंपन्या त्यातून कोट्यवधींचं उत्पन्न मिळवतात. मोबाइल गेमवर होणारी उलाढाल तब्बल कितीतरी बिलियन डॉलर आहे.
सोनज (जि. नाशिक) : एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने नक्कीच कात टाकली. विज्ञानाच्या साहाय्याने तंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व असे बदल घडले. मानवी जीवनाला आणि जागतिक स्पर्धेसाठी ते नक्कीच आवश्यक असले तरी काही गोष्टींचा वाजवीपेक्षा जास्त वापर झाल्याने काही क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विपर्यास झाला आहे. सध्याची तरुण पिढी अशाच प्रकारे गेमिंगच्या आहारी गेली आहे. ज्यामुळे मानवी जीवनावरच नाही तर तरुण पिढीच्या आरोग्यावर देखील घातक परिणाम होत आहेत.
(Gaming is detrimental effect on the health of the young generation)
मैदानी खेळांची जागा घेतली डिजिटल खेळांनी
काही वर्षांपूर्वी ‘ब्लू व्हेल’ गेमनं जगभरात हाहाकार माजवला होता. भारतात या गेमच्या आहारी जाऊन अनेकांनी आपला जीव गमावला. परिणामी सर्वोच्च न्यायालयापासून ते केंद्र सरकार, मानसोपचार तज्ज्ञ आणि पालकदेखील यातून आपली सुटका करून घेण्यासाठी उपाययोजना करतांना दिसून आले. टाईमपास व कामाच्या ताणातून हलकं होण्यासाठी विरंगुळा म्हणून खेळ खेळणं नवीन नाही. पूर्वी कॅरम, बुद्धिबळ असे बैठे तसेच मैदानी खेळही खेळले जायचे. ग्रामीण भागात विटीदांडू, सूर पारंब्या, लपंडाव, कबड्डी आदी खेळ प्रचलित होते. संगणक क्रांतीनंतर असे खेळ हळूहळू करत संपुष्टात आले. मैदानी खेळांची जागा डिजिटल खेळांनी घेतली. गेमच्या आहारी गेलेले तरुण पायी चालताना, बँकाच्या लाईनमध्ये, हॉटेलमध्ये चहा घेताना, वेळ मिळेल तिथं अगदी ट्रॅफिक सिग्नलच्या काही सेकंदातही गेम्स खेळताना दिसतात.
गेमच्या दिशेने वाकडं पाऊल
मोबाईल गेमचं वेड इतकं भयानक असतं की, गेम खेळणारे अगदी खाणं-पिणंसुद्धा विसरून जातात. सर्वसामान्यांसाठी गेम म्हणजे निव्वळ करमणूक किंवा विरंगुळा असतो, पण कंपन्या त्यातून कोट्यवधींचं उत्पन्न मिळवतात. मोबाइल गेमवर होणारी उलाढाल तब्बल कितीतरी बिलियन डॉलर आहे. आज लाखो व्हिडिओ गेम्स एका क्लिकवर अगदी सहज उपलब्ध होतात. आकर्षक डिझाईन, जिवंतपणाचा देखावा, क्षणिक व भौतिक सुखाचा आनंद देणारे गेम तासनतास खेळले जातात. आठ-दहा तास मनसोक्त खेळूनही मन भरत नाही. खेळण्याच्या नादात कुठलंही भान राहत नाही. सतत मोबाईल गेम्स खेळतच राहावंसं वाटतं.
गेम्सचे घातक व्यसन
मोबाईल गेम खेळण्याचं प्रमाण सगळ्याच वयोगटांमध्ये आहे. लहान मुले, तरुणाईत हे प्रमाण जास्त असून हा वर्ग मोबाईल गेमच्या अधिकच आहारी गेला. तंत्रज्ञानाच्या वाढत्या टप्प्यात ऑनलाईन गेम खेळणं वाढत आहे. जास्तीत जास्त टास्क, मारहाण अशा गेम्सना जास्त पसंती दिली जाते. प्रसिद्ध सिनेमा, त्याचे नायक, एखादा सुपरव्हिलेन गेमचा नायक असतो. नायक-खलनायकांची पात्रं घेऊन गेम तयार होतात. यातूनच गेम्सच व्यसनच जडत. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते अनेक कारणांमुळे मुलं हिंसक होत आहेत. अलीकडे त्याचं प्रमाण वाढत आहे. शहरांमधले पालक आपल्या मुलांवर पूर्णपणे लक्ष ठेवू शकत नाहीत. म्हणून ते मुलांच्या हाती फोन देतात. मोबाईलवर मुलं असे गेम्स खेळतात, ज्यातून हिंसक प्रवृत्तींना चालना मिळते. त्यातून अश्लील वेबसाईटचा शोध लागून त्यांच्याकरवी लैंगिक गुन्ह्याचे प्रकारही घडतात.
पालक म्हणून आपण काय करू शकतो
कुटुंबातील हरवलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे. लहान मुलं घरात असली की, त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळावेत. त्यांना कोणत्या तरी ॲक्टिव्हीटीमध्ये गुंतवावे. चित्रे काढायला सांगावे, कल्पक वृत्तीला चालना देण्यासाठी त्या प्रकारचं क्रिएटिव्ह वातावरण तयार करावं. डोक्याला ताण देणारी आणि त्यासोबत त्यांचा विकास होईल अशी एखादी गोष्ट केल्यास ती नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
तंत्रज्ञानामुळे शरीराला धोके उत्पन्न
तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर मानवी जीवन कमालीचं बदलल. नवनवीन टेक्नॉलॉजीने माणसाच जीवनच व्यापल. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत तंत्रज्ञानाशी आपला वारंवार सबंध येतो. सहज उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढून कार्य अधिक गतिशील झालं आहे. परिणामी तंत्रज्ञानामुळे शरीराला धोके उत्पन्न झाले. इलेक्ट्रॉनिक गॅझेटमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गानं मानवाला असाध्य आजाराला घेरल्याने गेम्सपासून दूर राहील पाहिजे.
- वैभव बोरसे, उपसरपंच, सावकारवाडी
इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे जडतात अनेक आजार
पाठदुखी, डोळ्यात जळजळ, डोळ्यात पाणी येणं, डोकेदुखी, भूक न लागणं, मळमळणं, बोटं बधीर होणं, झोप न येणं, हाताची बोटं अकडणं, अचानक चक्कर येणं, स्मरणशक्ती कमी होणे, कामात लक्ष न लागणे, चिडचिडेपणा अशा अनेक समस्या जाणवत आहेत. इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे मुलांना अनेक आजार जडले. लहान मुलांसाठी सामान्यतः स्क्रीन टाईम हा दिवसातून फक्त २ तास असावा. पालकांनी याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.
- डॉ. पियूष रणभोर, बालरोगतज्ञ, मालेगाव
(Gaming is detrimental effect on the health of the young generation)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.