रस्त्यात खड्डे, खड्ड्यात वृक्षारोपण! शेतकरी अन् ग्रामस्थांची गांधीगीरी

साक्री ते नामपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे
Road
Roadesakal
Updated on

अंबासन (जि. नाशिक) : धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या साक्री, नामपूर रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असूनदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप करीत रस्त्यावर वृक्षारोपण करून अनोख्या पध्दतीने स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगीरी आंदोलन छेडले.

Road
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना अटक

साक्री ते नामपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र या रस्त्यावरील खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप वाहनचालक तसेच स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. अनेक वेळा या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत संबंधित विभागाला तक्रारी करुनही लक्ष घातले जात नसून रस्त्यावर डागडुजी करणार तरी कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मागील काळात काही तरूणांनी स्वखर्चाने मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता मात्र रस्त्यावरून अवजड वाहतूकीसह शेतकऱ्यांचा शेतीमाल घेऊन जाण्यासाठी सोयीचा मार्ग असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. वाहनचालकांना नाशिक व धुळे जिल्ह्यात जा - ये करण्यासाठी तालुक्यात जवळचा रस्ता असल्याने या मार्गावर चिराई मातेचे मंदिर, तसेच साक्री तालुक्यातील म्हसदी येथील धनदाई माता मंदीर, धुळ्याची एकवीरा आई या देवस्थानात जाणाऱ्या भाविकांची खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत याबाबत निवेदनही सादर केले होते. रस्त्यावरील परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोळेझाक होत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त करीत संबधित विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यात गांधीगीरी आंदोलन छेडत वृक्षारोपण केले. यावेळी प्रगतीशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्त जिभाऊ कापडणीस, पंडित ठोके, युवराज कापडणीस, ललित सावंत, हिरामण कापडणीस, रोशन कापडणीस, सागर कापडणीस, मोठाभाऊ कापडणीस, बाबाजी आहिरे, सुनिल सावंत गांधीगिरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Road
40 वर्षानंतर मुलीच्या जन्माने भारावले घोटेकर कुटुंब

''साक्री, नामपूर रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांतून वाहनचालकांना मार्गस्थ होतांना कसरत करावी लागत आहे. याच रस्त्यावरून शेतीमाल विक्रीसाठी घेऊन जात असतो मात्र खड्ड्यातून प्रवास करतांना मोठ्या अडचणींतून जावे लागते.'' - जिभाऊ कापडणीस, सामाजिक कार्यकर्त खालचे टेंभे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.