नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात ‘जय भारत सत्याग्रह’ आंदोलनाची हाक दिली असून त्याअंतर्गत बुधवारी (ता. ५) शहर आणि जिल्हा युवक काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवीत गांधीगिरी करण्यात आली.
तसेच, देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, अदानी यावर जाब विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिकमधून पाच हजार पोस्टकार्ड पाठविण्यात आले. (Gandhijiri of Congress in support of Rahul Gandhi Direct questions to PM Modi from postcard campaign nashik news)
भोसला सर्कल येथे शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड, युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यात राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविली गेली. तर, राहुल गांधी यांच्यावरील कारवाई संदर्भात प्रश्न उपस्थित करत, वाढती महागाई, बेरोजगारी, उद्योगपती अदानी यावर जाब विचारण्यासाठी पोस्टकार्ड अभियान राबविले.
यात पाच हजार पोस्टकार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले. देशातील युवक हा देशाच्या पंतप्रधानांना आपल्या मूलभूत हक्काबद्दल प्रश्न विचारू शकतो व तो त्याचा मूलभूत अधिकार आहे हेच या पोस्टकार्ड अभियानातून सिद्ध झाले, असे मत याप्रसंगी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यपद परत बहाल व्हावे म्हणून युवक काँग्रेस जय भारत सत्याग्रहाच्या माध्यमातून जनजागृती करेल असे स्वप्नील पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
आंदोलनात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश सरचिटणीस हेमलता पाटील, माजी नगरसेवक समीर कांबळे, वत्सला खैरे, महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव, बबलू खैरे, उद्धव पवार, नितीन काकड, प्रदेश युवकचे सरचिटणीस गौरव पानगव्हाणे, विजय पाटील, ज्येष्ठ नेते नंदकुमार कर्डक, माजी सभागृह नेते सुभाष देवरे लक्ष्मण धोत्रे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष गौरव सोनार, अल्तमस शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
समांतर काँग्रेस गायब ?
शहराध्यक्षपदी आकाश छाजेड यांची नियुक्ती झाल्यानंतर छाजेड विरोधी गटाकडून समांतर काँग्रेस चालविली जात होते. दोन्ही गटाकडून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात होते. मात्र, राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर सुरू झालेल्या आंदोलनात शहरातील सर्व काँग्रेस एक झाल्याचे दिसून येत आहे.
राहुल गांधी यांच्या आंदोलनावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पक्षनिरीक्षक यांनी समांतर काँग्रेस पदाधिकारी यांना ताकीद दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच सर्व गट- तटाकडून एकत्र आंदोलने केली जात असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.