Nashik News : हरणूल (ता. चांदवड) येथील वीर जवान गणेश ऊर्फ विकी चव्हाण अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांच्या निनादात हजारोंच्या उपस्थितीत अनंतात विलीन झाले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. (Ganesh Chavan merges with Anant Burial in state ceremony Nashik News)
चार दिवसांपूर्वी जवान गणेश चव्हाण यांना जम्मू काश्मीरच्या पूंछ राजौरी येथे कुस्तीचा सराव करत असताना वीरमरण आले होते. सोमवारी (ता.११) त्यांच्या मूळ गावी हरणूल (ता.चांदवड) येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले.
त्यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सजवलेल्या ट्रकमधून त्यांची चांदवड शहरातून मिरवणूक काढण्यात आली. हरणूल येथे त्यांचे पार्थिव आल्यानंतर त्यांच्या शेतातील राहत्या घरी नेण्यात आले.
धार्मिक विधी झाल्यानंतर पुन्हा त्यांचे पार्थिव सजवलेल्या ट्रकमधून गावात आणण्यात आले व हरणूल गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. नंतर याठिकाणी अंत्यसंस्कारासाठी खास तयार करण्यात आलेल्या मंडपामध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले.
यावेळी सैन्यदलाच्या वतीने लेफ्टनंट कमांडर ओमकार कापले, मेजर अविनाश कुमार यांनी पुष्पचक्र अर्पण केले तर भारत सरकारतर्फे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक कैलास वाघ,
बाजार समितीचे सभापती संजय जाधव, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, सरपंच वंदना बाजीराव वानखेडे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गाढे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे बी.एन.सोनवणे, वाल्मिक वानखेडे, बौद्ध विहार येथील प्रमुख भदंत बोधीपाल आदींनी पुष्पचक्र अर्पण केले.
प्रा. तुषार चांदवडकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. सयाजीराव गायकवाड, उपसभापती कारभारी आहेर, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन आहेर, प्राचार्य दत्ता शिंपी, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, विकास भुजाडे, राजेंद्र दवंडे,
बाजीराव वानखेडे, गिताताई झाल्टे, समाधान जामदार, नवनाथ आहेर, अॅड. शांताराम भवर, पोलिस पाटील हरिदास पेंढारी, ग्रामसेविका वैशाली पाटील, तलाठी प्रियांका वाघ, सुरेश लोढा, राजेंद्र पारीख, डॉ. विकास चोरडिया, राजेंद्र गांगुर्डे, माजी सैनिक वाल्मीक पवार , राधाकृष्ण ठोंबरे, नवनाथ पवार आदींसह आजी, माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पुत्र देशासाठी कामी आला हे भाग्य
फोजी की मौत पर परिवार को दुःख कम और गर्व ज्यादा होता हैं, ऐसे सपूतों को जन्म देकर माँ का कोख भी धन्य हो जाता हैं, आपल्या पोटचा गोळा गेल्याचे प्रचंड मोठे दुःख असतानाही या वेदना सहन करीत माझा लाडका सुपुत्र देशाचा कामी आला.
तो देशासाठी जगला अन् लढला असं गर्वाने सांगताना विकी चव्हाणची आई गयाबाई चव्हाण यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
खरंतर देशाला कुस्तीतील ग्रीको रोमन रेसलर या प्रकारात सुवर्णपदक मिळवून द्यायचेच या धेय्याने कुस्तीचा सराव करत असतानाच जखमी झालेल्या विकीला वीरगती प्राप्त झाली.
अन् त्याच्या कुटुंबीयांसह अख्खा गाव हळहळला. भगूर येथील बलकवडे व्यायाम शाळेत कुस्तीचे धडे गिरवत असतानाच २०१८ मध्ये तो भारतीय सैन्यदलात महार रेजिमेंट मध्ये दाखल झाला.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो जम्मू काश्मीर मधील पूंछ राजौरी येथे कार्यरत होता. ग्रीको रोमन रेसलर या कुस्ती प्रकारात तो भारतीय सैन्यदलाकडून खेळत होता. ऑक्टोबर महिन्यात पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तो तयारी करीत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.