Ganesh Visarjan 2023: देवनदी खोरे भागात गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

Ganesh Visarjan procession drawn from flower tractors decorated by Sevakari Mandal of Swami Samarth Seva Kendra in Mahadev Temple
Ganesh Visarjan procession drawn from flower tractors decorated by Sevakari Mandal of Swami Samarth Seva Kendra in Mahadev Templeesakal
Updated on

Ganesh Visarjan 2023 : सिन्नरच्या पुर्वेकडील गावांमधील देवनदी खोरे भागात गणरायाला भक्तिमय वातावरणात विसर्जित करण्यात आले आहे. दुष्काळी स्थिती खरीप हंगाम पिकांची होरपळ झाली होती.

पण गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात शेतकरी बांधवांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले. (Ganesh Visarjan 2023 Farewell to Lord Ganesha in devotional atmosphere in Devnadi Valley Nashik)

दोन तीन पाऊस चांगले झाले. गणेशोत्सवात पाऊस झाला परंतु नदी नाले ओढे कोरडे ठाक आहे. पुर्वेकडील भाविकांनी वडांगळीच्या कोल्हापूर पध्दतीच्या साठवण बंधारे थोड फार साचलेल्या पाण्यात गणरायांचे विसर्जन केले.

त्यात वडांगळीसह किर्तांगळी कोमलवाडी चोंढी निमगाव देवपूर यांच्या सह शेत मळ्यातील मोठ्या गणेश मंडळाचा समावेश होतो. खडांगळीला युवा शिवशक्ती मंडळाने सजवलेल्या बैलगाडी तून गणरायांची मिरवणूक काढली आहे.

त्यात मेंढी च्या बाल वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकरी मुलांनी ज्ञानोबा तुकाराम गजरात गणरायांची निरोप लक्षवेधी ठरला आहे.

राहुल महाराज डुंबरे यांनी अभंग गायिली. वडांगळीला गणेश पेठेतील तडम ताशा ढोल जुन्या गढी परिसरातील मंडळाने ढफाच्या तालावर मिरवणूक काढली आहे. स्वामी समर्थ केंद्रातील भाविकांनी फुलांच्या सजवलेल्या ट्रॅक्टर मधून गणेश विसर्जन मिरवणुक काढली आहे.

सांयकाळी सात वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत घरगुती यांच्या सह सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती विसर्जन केले आहे. पाटपिप्री बारांगाव पिंप्री निमगाव सिन्नर गुळवंच भागातील सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वीस किलोमीटर अंतरावर नांदुरमध्येश्वर धरणात गणेश मूर्ती विसर्जित केल्या आहे.

"बाप्पा पावला आहे.आधी खरीपातील सर्व पिकांची होरपळ झाली आहे.आम्ही खडांगळीकरांनी वडांगळीच्या बंधारा मध्ये गणेश विसर्जन केले आहे."

- सचिन ठोक, टोमॅटो उत्पादक शेतकरी, खडांगळी, वडांगळी (ता सिन्नर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.