Ganeshotsav 2023 : सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाला 11 लाखांचे पारितोषिक! शेवटचे 4 दिवस बारापर्यंत देखावे खुले

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023 esakal
Updated on

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव मंडळांना यंदा अखेरचे चार दिवस रात्री बारापर्यंत देखावे खुले ठेवता येतील. राज्य शासनाने तसा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाला यंदा ११ लाखांचे पारितोषिक दिले जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

नियोजन भवनात गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. (ganeshotsav 11 lakh prize for best Ganesh Mandal nashik news)

जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, उपायुक्त मोनिका राऊत, गणेशोत्सव महामंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेटे आदी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, की गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याची जबाबदारी प्रशासनासोबत कार्यकर्त्यांचीही आहे. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविले जातील. वीजतारांचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न होतील.

मंडळांना एकाच ठिकाणी सगळ्या परवानग्या मिळतील. मंडळांना काही अडचणी येतात का, हे पाहण्यासाठी समिती नेमली जाईल तसेच स्वतंत्र जबाबदार असा अधिकारी नेमला जाईल. यंदा चांगल्या देखाव्यांना पारितोषिके दिले जातील. पहिले पारितोषिक ११ लाख रुपयांचे असेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023 : काजू, बदाम, चॉकलेटमध्ये सजला बाप्पा! मूर्ती बुकिंगनंतर वर्क करण्यावर भक्तांचा कल

देखावे पाहण्याचा वेळ वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार गणेशोत्सवात अखेरचे चार दिवस रात्री बारापर्यंत देखावे सुरू ठेवता येतील.

गणेश मंडळांना १०० युनिटपर्यंत घरगुती दराने वीज आकारणीचा विषय राज्य स्तरावरचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल. राज्यातील गणेशोत्सव मंडळांना कमी दराने वीज मिळावी म्हणून प्रयत्न करण्याचे आश्वासनही श्री. भुसे यांनी दिले.

गणेशोत्सव मंडळाच्या महामंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेटे, माजी महापौर विनायक पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक गजानन शेलार, प्रवीण तिदमे, बबलूसिंग परदेशी आदींसह विविध मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या.

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023 : राममंदिर, ‘कांतारा’ची गणेशोत्सवावर छाप; नागरिकांना भुरळ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.