Ganeshotsav 2023: वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मंडपावर कारवाई! पोलिस आयुक्तांचा गणेश मंडळांना इशारा

Ganesh Mandap
Ganesh Mandapesakal
Updated on

Ganeshotsav 2023 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी भव्यदिव्य मंडप आणि कमानी उभारण्याच्या कामांना सुरवात झाली आहे.

मात्र, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मंडप आणि कमानी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा सज्जड इशारा पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालय हद्दीतील सुमारे सव्वादोनशे मंडळांना पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी देण्यात आलेल्या आहेत.

अद्यापही काही अर्ज प्रलंबित असून त्यासंदर्भात प्रक्रिया होऊन लवकरच परवानगी दिली जाणार आहे. (Ganeshotsav 2023 Action on pavilions obstructing traffic Police Commissioner warning to Ganesh Mandals Nashik)

लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच, मंडळांकडून बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

मोठ्या मंडळांकडून भव्यदिव्य मंडपाच्या उभारणीचे कामे युद्धपातळीवर सुरू आहे. मंडप उभारण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिस आयुक्तालय व महापालिका प्रशासनाकडून सार्वजनिक मंडळांना अटी-शर्थींनुसार परवानगी दिली आहे.

मात्र या नियमांचे उल्लंघन करून मंडप व कमानीची उभारणी केली जात असल्यास, संबंधित मंडळांवर पोलिस आयुक्तालयातर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त शिंदे यांनी सांगितले आहे.

त्यासंदर्भात पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना मंडळांच्या मंडपाची उभारणी आणि कमानी यांची वाहतुकीला अडथळा अडथळा होणार नाही याबाबत पाहणी करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत.

असे असले तरी शहराच्या मुख्य रस्त्यालगत सार्वजनिक मंडळांनी मंडप उभारलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, रस्त्यावर कमानीही उभारल्या आहेत.

या कमानींमुळे सिटी लिंक बससह मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा मंडप व कमानी काढण्याची आवश्यकता जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ganesh Mandap
Ganeshotsav 2023 : कोकणातील तीन गाड्यांना पेणमध्ये थांबा

काही अर्ज प्रलंबित

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाकडे सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत.

त्यानुसार आयुक्तालयाच्या विशेष शाखेमार्फत आत्तापर्यंत २३४ मंडळांना परवानगी दिली आहेत. अजूनही काही अर्ज आयुक्तालयाकडे प्रलंबित आहेत.

त्यासंदर्भात पोलिस ठाणेनिहाय प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर प्रलंबित मंडळांनाही परवानग्या दिल्या जाणार आहेत.

"सार्वजनिक मंडळांनी मंडप वा कमानीची उभारणी करताना रस्ता वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. गणेशोत्सवात गर्दी होत असते. अशावेळी वाहतुकीला खोळंबा होण्याची शक्यता असते. असे मंडप वा कमानी असल्यास त्यावर कारवाई केली जाईल."

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

Ganesh Mandap
Ganeshotsav 2023 : सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाला 11 लाखांचे पारितोषिक! शेवटचे 4 दिवस बारापर्यंत देखावे खुले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()